AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govinda: धार्मिक ठिकाणी अफेअरचा शो-ऑफ.. गोविंदावर भडकली अभिनेत्री, म्हणाली ‘अत्यंत खालच्या दराचा..’

Govinda: अभिनेत्री दिव्या खोसलाने गोविंदाच्या कथित अफेअरच्या चर्चांदरम्यान भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने सुनिता अहुजाला पाठिंबा देत असल्याचं म्हणत गोविंदाबद्दल आदर गमावल्याचं म्हटलं आहे.

Govinda: धार्मिक ठिकाणी अफेअरचा शो-ऑफ.. गोविंदावर भडकली अभिनेत्री, म्हणाली 'अत्यंत खालच्या दराचा..'
गोविंदा- कोमल राणी स्वर्णकार, दिव्या खोसलाImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 29, 2026 | 9:43 AM
Share

अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. गोविंदाच्या ‘रूपा’ चित्रपटातील सहकलाकार कोमल राणी स्वर्णकारसोबतचं कथित नातं आणि दोघांच्या सार्वजनिक उपस्थितींमुळे या चर्चेला आणखी उधाण आलं आहे. आता अभिनेत्री दिव्या खोसलाने सुनिता अहुजाच्या समर्थनार्थ एक लांबलचक पोस्ट शेअर करत गोविंदांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सुनितानेही दिव्याची ही पोस्ट तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे.

दिव्या खोसलाची पोस्ट-

‘हा सगळा प्रकार वारंवार माझ्या डोळ्यांसमोर घडताना पाहिल्यानंतर मला हे मनात ठेवणं शक्यच झालं नाही. त्यामुळे माझे विचार मी शब्दांत मांडत आहे. आपला समाज एकेकाळी बहुपत्नीत्वाच्या प्रथेला मान्यता देणारा समाज होता, जिथे महिलांना पुरुषांच्या हातातील गुलामांपेक्षा अधिक काही समजलं जात नव्हतं. मात्र, काळाच्या ओघात आपल्या पणजी-खापरपणजींनी आपल्या मुलींना स्वतंत्र बनवण्यासाठी, त्यांना शिक्षण देण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आणि त्यांनी पाहिलेल्या आयुष्यापेक्षा चांगलं आयुष्य देण्यासाठी अथक मेहनत घेतली. महिलांनी पुरुषांच्या केवळ गुलाम बनून राहू नये, यासाठी त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली, स्वतःची कर्तृत्वं सिद्ध केली आणि स्वबळावर उभ्या राहिल्या. ही एक क्रांती होती. या क्रांतीमुळे आपल्या समाजात मोठा बदल झाला आणि बहुपत्नीत्वाकडून एकपत्नीत्वाकडे समाजाची वाटचाल झाली. या परिवर्तनामागे समाजातील सर्व स्तरांतील असंख्य महिलांचं मोठं योगदान होतं. मात्र, अलीकडे सोशल मीडियावर जे काही घडताना दिसत आहे, त्याने मला या सगळ्या परिवर्तनाबद्दलच प्रश्न पडायला लागला आहे,’ असं तिने लिहिलं आहे.

या पोस्टमध्ये तिने पुढे म्हटलंय, ‘गोविंदाजी हे अत्यंत ज्येष्ठ आणि आदरणीय अभिनेते आहेत. नव्वदच्या दशकात मोठं होत असताना त्यांचे चित्रपट पाहणं म्हणजे आमच्यासारख्या मिलेनियल पिढीसाठी निव्वळ मनोरंजन होतं. खरं सांगायचं तर, गोविंदाजी माझ्या आईचे आवडते अभिनेते होते आणि अर्थातच असंख्य लोकांचेही ते आवडते होते. सुनिताजी यांनी एक महिला म्हणून तुम्हाला स्वतःचं सर्वस्व दिलं. त्या तुमच्याशी एकनिष्ठ राहिल्या. त्यांनी तुमच्या मुलांचा सांभाळ केला. त्यांनी स्वतःचं करिअर कधीच उभं केलं नाही. यापेक्षा एखादी स्त्री आणखी काय करू शकते? त्या तुमच्या यशामागच्या स्त्री होत्या. तुम्ही बाहेरच्या जगात यशस्वी होता, पण त्या यशाचं श्रेय केवळ तुम्हाला देता येणार नाही. कारण घरात मुलांची जबाबदारी सांभाळण्याची वेळ कदाचित तुमच्यावर कधी आलीच नाही.’

वाचा पोस्ट-

‘आज एक महिला संपूर्ण समाजासमोर उभी राहून मदतीसाठी विनवणी करत आहे आणि आपण मात्र सगळे शांत आहोत. वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करायचा नाही, असं म्हणून कोणीही यामध्ये पडू इच्छित नाही. पण मग, जे काही सार्वजनिकरित्या आमच्यासमोर मांडलं जात आहे, ते प्रेक्षक म्हणून आम्हाला का पाहायला लावलं जात आहे? गोविंदाजी प्रत्येक दुसऱ्या दिवशी आपल्या गर्लफ्रेंडसोबत दिसण्याच्या या सगळ्या फेऱ्या का सुरू आहेत? हे सगळं पाहणं माझ्यासाठी अत्यंत संतापजनक आहे, विशेषतः अशा वेळी जेव्हा बहुपत्नीत्वाला वेगवेगळ्या मार्गांनी प्रोत्साहन दिलं जात असल्याचं आणि त्यावर पडदा टाकला जात असल्याचं दिसतं. आपण भावी पिढीसमोर कोणतं उदाहरण ठेवत आहोत? समाजाने पुन्हा बहुपत्नीत्वाच्या दिशेने मागे जावं, असंच आपण त्यांना शिकवणार आहोत का,’ असा सवाल दिव्याने केला आहे.

‘आपली संस्कृती जपूया. तुमचं अफेअर असलं तरी ते कृपया सार्वजनिकरित्या मांडू नका. आम्हाला त्यात रस नाही. अशा प्रकारचं प्रदर्शन पाहणं आमच्यासाठी अक्षरशः किळसवाणं आहे. आपल्या अफेअरचं प्रदर्शन करण्यासाठी धार्मिक स्थळांचाही वापर केला जातो, हे तर आणखी धक्कादायक आहे. आणि अर्थातच, स्वतःच्या पत्नीला खुनी ठरवण्याचा कट रचणं ही एखादा पुरुष करू शकणारी अत्यंत खालची गोष्ट आहे. आणि हो, सुनिताजी कदाचित कॉन्व्हेंटमध्ये शिकलेल्या नसतील. पण त्या जे काही बोलतात ते माझ्यापर्यंत पोहोचतंय. त्यांचं मन मला जाणवतंय. त्यांची वेदना मला जाणवतेय. वयाच्या 58व्या वर्षी, जेव्हा महिला आजी होण्याच्या वयात असतात, तेव्हा त्यांना फक्त एवढंच हवं असतं की आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात पतीने आपल्यासोबत असावं, आपली काळजी घ्यावी. मग आयुष्याची इतकी वर्षं, संपूर्ण आयुष्य या पुरुषासाठी त्याग करण्यात अर्थ काय, जर या वयातही पत्नी म्हणून आपल्या मूलभूत गरजांसाठी तिला संघर्ष करावा लागत असेल? सुनिताजी, माझं मन तुमच्यासोबत आहे आणि मला तुमच्यासाठी वाईट वाटतं,’ अशा शब्दांत दिव्याने भावना व्यक्त केल्या.

या पोस्टच्या अखेरीस तिने गोविंदासाठी लिहिलं, ‘गोविंदा जी.. माझी तुम्हाला एक विनंती आहे. तुम्ही एक दिग्गज कलाकार आहात, सर. पण तुमचा आदर तुमच्या स्वतःच्या हातात आहे. तुम्ही भावी पिढ्यांसमोर अत्यंत चुकीचं उदाहरण ठेवत आहात आणि माझ्या नजरेत तुम्ही तुमचा आदर गमावला आहे.’

Follow Us
बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Shweta Mahale : बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; श्वेता महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार?; भायखळा ते....
Thackeray Brothers : 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार? राज-उद्धव ठाकरे 11.30 वाजता पत्रकार परिषद घेणार; भायखळा ते...
धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून..
Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून...., नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...; शिवसेना आमदाराने सगळंच सांगून टाकलं
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर