AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govinda: तो जिच्यासोबत असेल, तिथे त्याने..; गोविंदाच्या अफेअरला वैतागून अखेर सुनिता अहुजाने सोडली आशा

Govinda: गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार यांच्या अफेअरच्या चर्चांवर सुनिता अहुजाने स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून गोविंदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे.

Govinda: तो जिच्यासोबत असेल, तिथे त्याने..; गोविंदाच्या अफेअरला वैतागून अखेर सुनिता अहुजाने सोडली आशा
सुनिता अहुजा, गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकारImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 29, 2026 | 8:05 AM
Share

Govinda: अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा यांच्या वैवाहिक आयुष्याबाबतच्या चर्चांना सध्या पुन्हा उधाण आलं आहे. गोविंदाचं नाव अभिनेत्री आणि को-स्टार कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबत जोडलं जात आहे. अलीकडेच दोघं मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी एकत्र गेल्याचं समोर आल्यानंतर या चर्चांना आणखी जोर आला. आता या सगळ्या प्रकरणावर सुनिता अहुजाने पहिल्यांदाच स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीत सुनिताला गोविंदा आणि कोमल राणी यांच्या कथित नात्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने गोविंदा किंवा त्याच्या को-स्टारबद्दल कोणतीही चर्चा करायची नसल्याचं स्पष्ट केलं. गोविंदा जिथे आणि जिच्यासोबत आनंदी आहे, तिथे त्याने आनंदी राहावं, अशी प्रतिक्रिया सुनिताने दिली.

याविषयी सुनिता पुढे म्हणाली, आता तिला या सगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं नाही. तिचा मुख्य फोकस स्वतःच्या आयुष्यावर आणि कामावर आहे. वारंवार वाद आणि चर्चांमध्ये अडकण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष देणं अधिक महत्त्वाचं असल्याचं तिने म्हटलं आहे. सुनिताने पुढे सांगितलं की, गोविंदाच्या आयुष्याबद्दल ती आता काहीही बोलू इच्छित नाहीत. ती देवाकडे प्रार्थना करते की गोविंदा जिथे असेल, जिच्यासोबत असेल, तिथे त्याने सुखी राहावं. तिच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

कोमल राणीने सुनितावर केले होते गंभीर आरोप

या प्रकरणाला काही दिवसांपूर्वी आणखी वेगळं वळण मिळालं होतं. कोमल राणीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सुनिता अहुजावर गंभीर आरोप केले होते. तिने सुनितावर गोविंदाला मारण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला होता. तसंच त्यांचं घर आधीच मोडलेलं असल्याने ते पुन्हा कोणी मोडू शकत नाही, असा टोमणाही तिने मारला होता. दरम्यान, गोविंदाच्या कुटुंबातील सदस्य आणि अभिनेत्री कश्मीरा शाह हिनेही सुनिताच्या समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्ट केली होती. कोमल राणीच्या आरोपांवर तिने स्पष्ट नाराजी व्यक्त केली आणि सुनिताच्या बाजूने कायम उभं असल्याचं सांगितलं होतं.

याआधी एअरपोर्टवर पापाराझींनी सुनिताला तिच्या पाळीव श्वानाबद्दल विचारलं होतं. त्यावर उत्तर देताना सुनिताने माणसांपेक्षा प्राण्यांवर प्रेम करण्याचा सल्ला दिला होता. “माणसांना कितीही प्रेम द्या, फायदा नाही; ते धोकाच देतात,” अशा आशयाचं वक्तव्य सुनिताने केलं होतं. गोविंदा आणि कोमल राणी यांनी एकत्र लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर तिची ही प्रतिक्रिया चर्चेत आली होती.

Follow Us
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र