AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold rate : सोन्याचे भाव कोसळले, सोने खरेदीची सुवर्णसंधी, उच्चांकापेक्षा तब्बल 55 हजारांनी..

Todays Gold rate : सोन्याच्या दरात मोठी घसरण होताना दिसत आहे. सोन्याचे भाव घसरताना दिसत आहेत. आजही सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. सोन्याचा दर त्याच्या उच्चांकापेक्षा 50 हजारांनी कमी झाला.

Todays Gold rate : सोन्याचे भाव कोसळले, सोने खरेदीची सुवर्णसंधी, उच्चांकापेक्षा तब्बल 55 हजारांनी..
Todays Gold rate
| Updated on: Sep 21, 2026 | 12:55 PM
Share

इराण आणि अमेरिका युद्धादरम्यान सोने आणि चांदीचे भाव घसरताना दिसले. आता पुन्हा सोने आणि चांदीचे भाव घसरले आहेत. सोने इराण आणि अमेरिका युद्ध सुरू होण्यापूर्वी 2 लाखाच्या आसपास पोहोचले होते. मात्र, जशीही युद्धाला सुरूवात झाली, तसे सोन्याचे भाव धाड धाड घसरले. 21 सप्टेंबर रोजी सोने आणि चांदीच्या दरात घट दिसून येत आहे. MCX वर सोन्याचे भाव 583 रुपयांनी घसरले. प्रति 10 ग्रॅम 1 लाख 53 हजार 798 रूपयांवर व्यवहार करत आहे. चांदीचे भाव 713  रूपयांनी कमी होऊन प्रति किलो 2,40,890 रूपयांवर आले. दिल्लीतील सोन्याचा दर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,55,980 रूपये आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 1,42,,990 रूपये आहे. सोन्याचे भाव चांगलेच कोसळताना मागील काही दिवसांपासून दिसत आहेत.

सोन्याचे भाव भारतात अजून घसरताना दिसू शकतात. भारत सरकार सोन्यावरील ड्युटी कमी करण्याच्या तयारीत आहे. सोन्यावरील ड्युटीत मोठी वाढ करण्यात आली. मात्र, त्याने सोने खरेदीवर कोणताही परिणाम झाला नाही. उलट गैरव्यवहारात मोठी वाढ झाली. त्यामुळे सोन्यावरील ड्युटी कमी सरकार करू शकते, तसे संकेतही देण्यात आली.

मुंबईत सोन्याचे दर 24 कॅरेटचे प्रति 10 ग्रॅम 1,55, 830 रूपये तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1, 42, 840 इतकी नोंदवली गेली. पुणे, चेन्नई आणि बेंगळुरूमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,55,830 रूपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,42,840 रूपये आहे. मागच्या काही दिवसांचा विचार करता सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली.

सरकारने सोन्यावरील ड्युटी कमी केल्यानंतर सोन्याचे दर अधिक कमी होतील. मात्र, वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सोने न खरेदी करण्याचे आवाहन केले जात आहे. यासोबतच विदेशात लग्न टाळण्याचेही आवाहन केले जात आहे. विदेशातील प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले. सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले जात असले तरीही लोक मोठ्या संख्येत सोने खरेदी करत आहेत. सोने खरेदीवर लोकांचा भर असल्याचे दिसत आहे.

Follow Us
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल