AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोड खाल्ल्यावर लगेच झोप का येते? 99% लोकांना माहीत नाही यामागचं खरं कारण

गोड पदार्थ पूर्णपणे बंद करण्याची गरज नसली तरी प्रमाणावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे. आहारात प्रोटीन, फायबर आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्याने जेवण अधिक संतुलित ठेवण्यास मदत होते. गोड खाल्ल्यानंतर काही वेळ हलकं चालणंही उपयोगी ठरू शकतं.

गोड खाल्ल्यावर लगेच झोप का येते? 99% लोकांना माहीत नाही यामागचं खरं कारण
गोड खाल्ल्यावर लगेच झोप का येते? Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 21, 2026 | 12:01 PM
Share

गोड पदार्थ म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. मिठाई, चॉकलेट, केक किंवा एखादा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर मन प्रसन्नही होतं. मात्र, काही जणांना गोड खाल्ल्यानंतर काही वेळातच सुस्तपणा आणि झोप येऊ लागते. ही केवळ आळशीपणाची भावना नसून, खाण्यानंतर शरीरात होणाऱ्या विविध प्रक्रियांशी त्याचा संबंध असू शकतो. विशेषतः जास्त प्रमाणात साखर असलेले पदार्थ खाल्ल्यानंतर रक्तातील ग्लुकोज आणि इन्सुलिनच्या पातळीत बदल होऊ शकतात. गोड पदार्थांमध्ये साधारणपणे साखरेचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे ते खाल्ल्यानंतर रक्तातील ग्लुकोजची पातळी वेगाने वाढू शकते. शरीर ही वाढ नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिन सोडतं. इन्सुलिनच्या मदतीने ग्लुकोज पेशींमध्ये पोहोचतो आणि शरीराला ऊर्जा मिळते. या प्रक्रियेदरम्यान काही लोकांना थोडा थकवा किंवा सुस्तपणा जाणवू शकतो.

ट्रिप्टोफॅन आणि सेरोटोनिनची भूमिका

गोड पदार्थ खाल्ल्यानंतर शरीरातील काही जैवरासायनिक प्रक्रियांमध्ये बदल होतात. कार्बोहायड्रेट्सच्या सेवनामुळे इन्सुलिन वाढल्याने रक्तातील काही अमिनो ॲसिड्सच्या तुलनेत ट्रिप्टोफॅनचा मेंदूपर्यंत पोहोचण्याचा प्रमाणात बदल होऊ शकतो. ट्रिप्टोफॅनपासून सेरोटोनिन तयार होतं. सेरोटोनिनचा मूड आणि विश्रांतीशी संबंध आहे. पुढे त्यापासून मेलाटोनिन तयार होतं, जे झोपेच्या चक्रात महत्त्वाची भूमिका बजावतं. मात्र, केवळ गोड खाल्ल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला झोप येते, असं निश्चितपणे म्हणता येत नाही.

‘ब्लड शुगर क्रॅश’मुळे वाढतो थकवा?

गोड पदार्थ खाल्ल्यानंतर रक्तातील साखर वाढते आणि त्यानंतर ती कमी होऊ शकते. काही व्यक्तींमध्ये हा बदल वेगाने झाल्यास थकवा, अशक्तपणा किंवा एकाग्रता कमी होण्यासारखी लक्षणं जाणवू शकतात. याला सामान्यपणे ‘ब्लड शुगर क्रॅश’ म्हटलं जातं.

जेवल्यानंतर झोप का येते?

गोड पदार्थ अनेकदा जेवणानंतर खाल्ले जातात. मोठं किंवा जड जेवण केल्यानंतर पचनसंस्थेतील प्रक्रिया सक्रिय होतात आणि शरीरातील हार्मोनल बदलांमुळेही काही वेळा पोस्ट-मी‍ल ड्रोझिनेस, म्हणजेच जेवल्यानंतरची गुंगी जाणवू शकते. त्यामुळे गोड पदार्थ आणि त्यानंतरची झोप यांचा संबंध प्रत्यक्षात संपूर्ण जेवणाच्या स्वरूपाशीही असू शकतो.

झोप आणि सुस्तपणा कमी करण्यासाठी काय कराल?

  • गोड खाल्ल्यावर लगेच झोप येण्यापासून वाचण्यासाठी गोड पदार्थ कमी प्रमाणात खा.
  • आहारात फायबर आणि प्रोटीन असलेले पदार्थ जास्त घ्या, ज्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते.
  • गोड खाल्ल्यानंतर थोडं चालणं किंवा हलका व्यायाम केल्यास मदत होते.
  • दिवसभर पुरेसं पाणी प्या आणि झोपेचं वेळापत्रक नियमित ठेवा.

डिस्क्लेमर: ही विविध स्त्रोतावरून घेतलेली माहिती आहे, टीव्ही 9 मराठी त्याला दुजोरा देत नाही. तुमच्या वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला आवर्जून घ्या.

Follow Us
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...