रस्त्याच्या कडेला असते ही बहुगुणी वनस्पती, सांधेदुखी अशक्तपणा होतो दूर, नाव काय? वापर कसा करावा?
रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागेत दिसणारी तोदरी ही आयुर्वेदात वापरली जाणारी वनस्पती आहे. तिच्या बिया, पाने आणि फुलांचा पारंपरिक उपचारपद्धतीत उल्लेख आढळतो. दिसायला साधी असली तरी तोदरीचा आयुर्वेदात विविध कारणांसाठी वापर केला जातो.

रस्त्याच्या कडेला,शेताच्या बांधावर किंवा मोकळ्या जमिनीवर उगवलेली अनेक झाडं- झुडपं आपण सहज गवत समजून दुर्लक्ष करतो. पण याच साध्या दिसणाऱ्या वनस्पतींपैकी काहीचं आयुर्वेदात विशेष महत्त्व आहे. अशीत एक वनस्पती म्हणजे तोदरी. इंग्रजीमध्ये तिला pepper Grass म्हटलं जातं. आयुर्वेदात या वनस्पतीचा विविध समस्यांसाठी वापर केला जातो.
तोदरी नेमकी काय आहे
तोदरी मुख्यत: पांढऱ्या, लाल आणि पिवळ्या बियांच्या प्रकारात आढळते. यापैकी पिवळ्या बियांची तोदरी अधिक गुणकारी मानली जाते. ही लहान शाकीय वनस्पती असून तिची पाने लांब आणि फुले लहान, पांढऱ्या रंगाची असतात.
श्वासाचे आजार होतील दूर
आयुर्वेदात तोदरीच्या बियांचा वापर श्वासनलिकेतील सूज आणि ब्रॉन्कियल समस्यांसाठी केला जातो.याच्या बियांचा तयार केलेला काढा याचा वापर पारंपारिक औषधोपचारात केला जातो.
तोदरीमुळे अतिसारापासून आराम मिळतो
आयुर्वेदिक तज्ञांच्या मते अतिसार म्हणजेच जुलाबाचा त्रास कमी करण्यासाठी तोदरीच्या पानांचा वापर केला जातो. याचा काढा करून प्यायल्याने पोटाला पुर्णपणे आराम मिळतो.
मूत्रविकारांसाठी फायदेशीर
लघवी करताना होणारी जळजळ, वेदना या तोदरीच्या उपचारामुळे कमी होण्यास मदत होते. तोदरीच्या पानांचे चुर्ण करून लावल्याने किंवा याचा काढा प्यायल्याने मूत्रविकारांपासून आराम मिळतो.
अशक्तपणा आणि थकवा दूर करण्यास मदत
दूधात खडीसाखर आणि तोदरीची पूड मिसळून प्यायल्याने थकवा आणि अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. यामुळे शरीर अधिक मजबूत आणि ताकदवान होते.
सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत करते
सांधे दुखत असतील तर तोदरीच्या फुलांचे तेल लावावे. मालिश करावे. यामुळे सांधेदुखी कमी होते. याशिवाय तोदरीच्या पानांची पेस्ट सूज असलेल्या ठिकाणी लावल्यावर सूज लवकर उतरण्यास मदत होते.
वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.
