एअर होस्टेसची ट्रेनिंग सोडून, हातात घेतल ट्रकच स्टेअरिंग; हिमालयाच्या नेहा ठाकूरची कहाणी व्हायरल
एअर होस्टेसची ट्रेनिंग घेतली, पण मन ट्रकच्या स्टेअरिंगमध्ये रमलं नेहा ठाकूरची प्रेरणादायी कहाणी झाली व्हायरल.नेहा ठाकूर बनल्या हिमालयातील पहिल्या महिला ट्रक ड्राईव्हर

एअर होस्टेस बनण्याच स्वप्न… ग्लॅमरस करिअरची तयारी पण मन मात्र ट्रकच्या स्टेअरिंगमध्येच अडकलेलं. हिमाचल प्रदेशातील नेहा ठाकूरची कहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हिमालयीन धाकड गर्ल नेहा ठाकूरने एअर होस्टेसची ट्रेनिंग घेतली होती. पण तिच मन काही तिथं रमलं नाही आणि तिने थेट ट्रक ड्राईव्हिंग करण्याचा निर्णय घेतला. आज ती हिमाचल प्रदेशातील पहिली महिला ट्रक ड्राईव्हर म्हणून ओळखली जाते.
ट्रकशी लहानपणापासून नातं
नेहा ठाकूर हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील मंडी जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिचे वडील हे पेशाने ट्रक ड्राईव्हर आहेत. त्यामुळे लहानपणापासून नेहाचा ट्रक आणि लांबच्या प्रवासाशी जवळचा संबंध होता. शाळेत किंवा इतर ठिकाणी ट्रकमधूनच जाण – येणं व्हायचं त्यामुळे ट्रक आणि तिचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते.
एअर होस्टेसची ट्रेनिंग
प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर नेहाने चंदीगड गाठलं. तिथेच तिने एअर होस्टेसची ट्रेनिंग पूर्ण केली. मात्र तिचं मन काही तिथे रमलं नाही. जबरदस्तीने एखादी गोष्ट करण्यापेक्षा तिनं तिच आवड जोपासायचा ठरवलं आणि त्यातच आपल करिअर करण्याच ठरवलं.
नेहाच्या निर्णायाला वडिलांचा पाठिंबा
२०२२ मध्ये नेहाने ट्रक ड्रायव्हर बनण्याचा निर्णय घेतला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या या निर्णयाला वडिलांनी पुर्णपणे पाठिंबा दिला. उराशी स्वप्न आणि सोबत वडिलांची साथ यामुळेच आज नेहा हिमालयातील पहिली महिला ट्रक डायव्हर बनली.
ट्रक चालवतानाच जडला गोष्टी सांगण्याचा छंद
२०२३ मध्ये नेहाने हिमालयाच्या डोंगराळ रस्त्यांवर ट्रक चालवण्यास सूरूवात केली. या क्षेत्रात स्वत: ची ओळख निर्माण केली. ट्रक चालवताना तिला विविध लोक भेटली, विविध प्रसंग घडले. त्यातच तिला व्हिडिओ बनवण्याचा छंद लागला. त्यामुळे या प्रवासादरम्यानच्या गोष्टी तिने सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरूवात केली. डोंगराळ पहाडी रस्ते, ट्रकची लोंडिग-अनलोडिंग आणि रोजच्या प्रवासाच्या गोष्टी ती सोशल मीडियावर शेअर करत होती.
व्हायरल व्हिडिओ
नेहाने सोशल मीडियावर असाच एक डोंगराळ कठीण रस्त्यावर ट्रक चालवतानाच व्हिडिओ शेअर केला होता. जिथे अनेक ट्रक डाईव्हर जाणे टाळतात अशा ठिकाणी तिने सर्रासपणे ट्रक चालवला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला. एवढ्या कठीण रस्त्यावर एका तरूण महिला आत्मविश्वासाने ट्रक चालवतावना पाहून अनेकजण आश्चर्यचकित झालेय
जुनूनू, मेहनत आणि आत्मविश्वास महत्त्वाचा
नेहाच्या मते कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आवड, मेहनत आणि आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. स्वत: च्या आवडीचं करिअर निवडण्यासाठी तिने पारंपरिक विचारांची पर्वा केली नाही. तिची ही कहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून विचारांची चौकट मोडू पाहणाऱ्या तरूणांसाठी प्रेरणादायी आहे.
