Spam Calls : आता या फोन कॉलला भरावे लागणार पैसे, TRAI चा नवा नियम, जाणून घ्या तुम्हाला काय झळ बसणार
सतत येणारे Loan, KYC, Credit Card आणि Discountचे Automated Calls आता TRAIच्या नव्या नियमांच्या कक्षेत आले आहेत. A2P कॉल्ससाठी प्रति मिनिट ५ पैशांपर्यंत termination chargeची तरतूद करण्यात आली आहे.

तुमचं क्रेडिट कार्ड बंद होईल, हे लोन घ्या, केवायसी, या ठिकाणी हा डिस्काउंट आहे. असे बरेच कॉल्स आता अनेकांच्या डोक्याला ताप झाले आहेत. नंबर ब्लॉक केला तरी दुसऱ्या नंबरवरून पुन्हा कॉल येते आणि परत तीच रटाळ कॉल रेकॉर्डिंग ऐकत बसावी लागते. मात्र आता अशा अनावश्यक आणि ऑटोमेटेड कॉल्सवर लगाम घालण्यासाठी दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच TRAI ने मोठं पाऊल उचचलं आहे.
A2P कॉल म्हणजे काय
A2P कॉल म्हणजे काय तर सॉफ्टेवेअर, रेकॉर्डेड कॉल्स, ऑटोमेटेड सिस्टमच्या माध्यमातून केलेले कॉल. त्यामुळे या कॉलवर नव्या नियमांनुसार A2P कॉल्सवर प्रति मिनिट ५ पैशापर्यंत टर्मिनेशन चार्ज आकारला जाण्याची शक्यता आहे
५ पैसे नेमके कोणाला भरावे लागणार?
TRAI ने A2P कॉल्ससाठी कमीत कमी ५ पैसे प्रति मिनिट टर्मिनेशन चार्जची मर्यादा निश्चित केली आहे. तसेच प्रत्यक्ष कॉल चार्ज किती असावा हे संबंधित टेलिकॉम कंपन्यांमधील व्यावसायिक करारानुसार ठरू शकते. त्यानुसार त्या कंपन्याच्या कॉल्सवर चार्ज आकारण्यात येणार आहे.
AI ठेवणार स्पॅम कॉल्सवर नजर
TRAI ने केवळ पैसेच लागू केले नसून त्यावर नजर ठेवण्यासाठी AI ची देखील मदत घेणार आहे. संशयास्पद स्पॅम कॉल्स ओळखण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना AI आणि मशीन लर्निंगसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जास्त स्पॅम कॉल्स येत असतील तर AI च्या मदतीने त्याचा शोध घेतला जाणार आहे.
नव्या नियमामुळे कॉल्स पुर्णपणे बंद होणार
नव्या नियमांमुळे कॉल्स पुर्णपणे बंद होतील असे नाही . पण काही प्रमाणात याला आळा बसण्याची शक्यता आहे. TRAI च्या या नियमामुळे कॉल्सची ओळख पटवणे आणि त्यावर कारवाई करणे अधिक सोपं जाणार आहे.
