AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Success Story : KBC मध्ये 50 लाख जिंकले, आता UPSC मध्येही कमाल, वाचा 22 वर्षीय विकास सिंह पंवार यांची यशोगाथा

Vikas Singh Panwar : KBC चा मंच गाजवणारे विकास सिंह पंवार आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अवघ्या 22व्या वर्षी विकास यांनी UPSC परीक्षेत ऑल इंडिया 159वा क्रमांक मिळवत मोठे यश संपादन केले आहे.

Success Story : KBC मध्ये 50 लाख जिंकले, आता UPSC मध्येही कमाल, वाचा 22 वर्षीय विकास सिंह पंवार यांची यशोगाथा
Vikas Singh Panwar Success StoryImage Credit source: Google
| Updated on: Sep 07, 2026 | 6:38 PM
Share

कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर बसून लाखो प्रेक्षकांची मने जिंकणारे विकास सिंह पंवार आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र, यावेळी त्याच्या चर्चेचे कारण गेम शो नसून देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या UPSC नागरी सेवा परीक्षा आहे. अवघ्या 22व्या वर्षी विकास यांनी UPSC परीक्षेत ऑल इंडिया 159वा क्रमांक मिळवत मोठे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

UPSC परीक्षेत यश

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, विकास सिंह पंवार यांना लेखी परीक्षेत एकूण 787 गुण, तर मुलाखतीत 201 गुण मिळाले. या दोन्ही गुणांची बेरीज केल्यानंतर त्यांना देशभरात 159वा क्रमांक मिळाला. विशेष म्हणजे विकास यांनी हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळवले आहे. अनेक उमेदवारांना UPSC मध्ये यश मिळवण्यासाठी दोन-तीन किंवा त्याहून अधिक प्रयत्न करावे लागतात. अशा परिस्थितीत पहिल्याच प्रयत्नात मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद मानले जात आहे.

हिमाचलमधील छोट्याशा गावात बालपण

विकास सिंह पंवार हे मूळचे हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील चौपाल परिसरातील कुपवी येथील जुबली गावचे रहिवासी आहेत. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण शिमला येथील डीएव्ही न्यू शिमला स्कूलमध्ये झाले. त्यांनी दहावी आणि बारावी या दोन्ही वर्गांमध्ये स्टेट बोर्डमध्ये पहिला क्रमांक मिळवला होता. यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातील प्रतिष्ठित हिंदू कॉलेजमधून बीए ऑनर्सची पदवी घेतली. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी UPSC परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. याच काळात त्यांनी UGC-NET सारखी परीक्षाही यशस्वीपणे उत्तीर्ण केली.

विकास यांचे वडील सरकारी शाळेत प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. UPSC मधील आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय विकास यांनी वडिलांना दिले आहे. UPSC अधिकारी होणे हे त्यांचे स्वतःचे स्वप्न असले तरी त्यामागची खरी प्रेरणा वडिलांकडून मिळाल्याचे त्यांनी सांगितले. वडिलांचा संघर्ष आणि शिस्त पाहूनच त्यांच्या मनात नागरी सेवेत जाण्याची इच्छा निर्माण झाली.

KBC मध्ये जिंकले होते 50 लाख रुपये

विकास सिंह पंवार यांचे नाव पहिल्यांदाच चर्चेत आलेले नाही. यापूर्वी 2025 मध्ये ते सोनी टीव्हीवरील प्रसिद्ध ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात आपल्या ज्ञानाचे उत्तम प्रदर्शन करत त्यांनी प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले होते. त्यांच्या हुशारीने आणि प्रश्नांची उत्तरे देण्याच्या पद्धतीने महानायक अमिताभ बच्चन देखील प्रभावित झाले होते. या भागात विकास यांनी तब्बल 50 लाख रुपये जिंकले होते.

विशेष म्हणजे विकास या कार्यक्रमात 1 कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचले होते. मात्र, योग्य उत्तराबाबत खात्री नसल्याने त्यांनी त्याच ठिकाणी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. आता KBC मध्ये आपल्या ज्ञानाची छाप पाडल्यानंतर विकास यांनी UPSC परीक्षेतही दमदार कामगिरी करत आपल्या यशाची नवी ओळख निर्माण केली आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात