हॉटेलमधील टॉवेल जुने झाल्यावर त्यांचं काय होतं, कसा होतो पुनर्वापर? जाणून घ्या सविस्तर
Hotel Towels: हॉटेलमधील अशा अनेक गोष्टी आहेत ज्या फार कोणाला माहिती नसतात. तर हॉटेलच्या खोलीत टॉवेल वापरायला देतात. पण ते टॉवेल जुने झाल्यानंतर त्यांचं काय होतं. ते जाणून घ्या.

Hotel Towels: फिरायला गेल्यानंतर सर्वात आधी आपण हॉटेल बूक करतो. हॉटेलमध्ये अनेक सोयी देखील असतात. हॉटेलच्या बाथरूममधील जाड, मऊ आणि चमकदार पांढरे टॉवेल पाहून, काही काळानंतर त्यांचे काय होईल याचा क्वचितच कोणी विचार केला असेल. वारंवार वापर आणि धुण्यामुळे टॉवेलचे कापड हळूहळू पातळ होऊ लागतं, त्याचा पांढरेपणा कमी होऊ लागतो आणि त्याची पाणी शोषण्याची क्षमताही कमी होते.मात्र, याचा अर्थ असा नाही की प्रत्येक जुना टॉवेल सरळ कचऱ्यात फेकला जातो. ‘क्लीन इंडिया जर्नल’नुसार, हॉटेल उद्योग जुन्या चादरी आणि टॉवेलचा पुनर्वापर करण्यासाठी अनेक मार्ग अवलंबतात.
जे टॉवेल पाहुण्यांसाठी वापरण्यायोग्य राहत नाहीत, परंतु त्यांचे कापड चांगल्या स्थितीत असेल, ते हॉटेलच्या इतर कामांसाठी वापरले जातात. उदाहरणार्थ, ते साफसफाईचे कापड किंवा धूळ पुसण्यासाठी वापरले जातात. ‘हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स’ म्हणतात, की जुने टॉवेल साफसफाईचे कापड म्हणून वापरले जातात. याव्यतिरिक्त, रंगकाम करताना फरशी किंवा फर्निचर पुसण्यासाठी म्हणूनही वापरले जातात. म्हणजेच, खोली सोडल्यानंतरही हॉटेलमध्ये टॉवेलची उपयुक्तता कायम राहते.
प्रत्येक हॉटेलचे धोरण सारखं नसतं. काही ठिकाणी अशा चादरी गरजू लोकांना किंवा संस्थांना पोहोचवण्याची व्यवस्था असते. ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या एका रिपोर्टनुसार, काही हॉटेल्स त्यांचं रूपांतर साफसफाईच्या फडक्यांमध्ये करतात, तर काही हॉटेल्स ते अनाथाश्रम किंवा धर्मादाय संस्थांना देतात. या रिपोर्टमध्ये एका खाजगी हॉटेल समूहाने प्राण्यांच्या निवारागृहांना जुने टॉवेल दान करण्याच्या उपक्रमाचाही उल्लेख आहे.
जेव्हा टॉवेल प्रचंड जीर्ण होतात की त्यांचा थेट पुनर्वापर करता येत नाही, तेव्हा कापड पुनर्वापर हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. पुनर्वापर प्रक्रियेमध्ये, कापडावर प्रक्रिया करून त्याच्या तंतूंचा पुनर्वापर केला जातो. भारतात हॉटेलमधील लिननच्या पुनर्वापराचा एक उपक्रमही सुरू आहे. हॉटेल्स आणि रुग्णालयांमधील लिनन टॉवेल गोळा करून त्यांचं नवीन उत्पादनांमध्ये रूपांतर केलं जातं.
अशा प्रकारे, हॉटेलच्या बाथरूममधून बाहेर पडल्यावरही टॉवेलचा प्रवास संपत नाही. जर तो चांगल्या स्थितीत असेल, तर तो स्वच्छतेसाठी वापरला जातो, दान केला जातो आणि जर तो पूर्णपणे जीर्ण झाला असेल, तर त्याचे पुनर्चक्रीकरण केलं जातं व तो एका नवीन रूपात समोर
