AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Crime: सिद्धार्थ गोरे मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, दारू प्यायला आणि मग… तो Video समोर

Nashik Siddharth Gore Case: नाशिकमधील सिद्धार्थ गोरे प्रकरणाला वेगळं वळण मिळाले आहे. रस्त्यावर टाकलेल्या लोखंडी पाईपला धडकून त्याचा अपघात झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी कंत्राटदारावर संदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Nashik Crime: सिद्धार्थ गोरे मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, दारू प्यायला आणि मग... तो Video समोर
सिद्धार्थ गोरे अपघात प्रकरणImage Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 19, 2026 | 12:24 PM
Share

नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी विविध विकास योजना सुरू आहेत. रस्ते विकास करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी कामं सुरू आहेत. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्ते खोदून ठेवल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर टाकलेल्या लोखंडी पाईपला धडकून सिद्धार्थ गोरे या तरुणाचा अपघात झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नाशिककर संताप व्यक्त करत आहेत. कंत्राटदारावर संदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

अपघात प्रकरणाला नवीन वळण

अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बिअर बारमध्ये मद्यप्राशन करतानाचा सिद्धार्थ गोरेचा व्हिडिओ समोर आला आहे. मद्यधुंद अवस्थेत या युवकाचा वारंवार तोल जाताना दिसत आहे. दुचाकीवर बसतानाही युवकाला मदतीची गरज घेतल्याचे दिसले. काही युवकांनी दुचाकीवर बसवून दिल्याचं व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर दुचाकी चालवताना अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातानंतर महापालिका प्रशासनावरही टीका झाली होती. रस्त्यांच्या कामांमुळे अपघात वाढल्याचा नागरिकांचा आरोप आहे. मात्र व्हायरल व्हिडिओमुळे अपघाताला नवे वळणं मिळाले आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवण्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्ते दोषी की चालकाची चूक? व्हिडिओमुळे असा सवाल विचारल्या जात आहे.

अपघाताची घटना घडल्यानंतर सुरुवातीला नागरिकांनी नाशिक महानगरपालिका प्रशासनावर जोरदार टीका केली होती. शहरातील रस्त्यांची दुरावस्था, अर्धवट कामे आणि खड्ड्यांमुळेच हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला होता. पण आता हा व्हिडिओसमोर आल्यानंतर नवीन वाद निर्माण झाला आहे.

8 महिन्यांची चिमुकली बेपत्ता

नाशिक जिल्ह्यात 8 महिन्यांच्या चिमुकलीच्या बेपत्ता होण्याने खळबळ उडाली आहे. नांदगाव तालुक्यातील मन्याड चौकी येथे मध्यरात्रीची घटना घडली आहे. मध्यरात्री 12 वाजेच्या दरम्यान आई – वडिलांच्या अंथरुणावरून चिमुरडी गायब झाली होती. स्थानिक गुन्हे शाखा, वरिष्ठ पोलीस यंत्रणेसह स्थानिकांकडून चिमुरडीचा कसून शोध घेण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटना स्थळी तळ ठोकून होते. या प्रकरणी नांदगाव पोलिसात चिमुकलीच्या वडिलांनी दिली अपहरणाची फिर्याद दिली आहे.

Follow Us
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड