AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Story : आता एक तासाचा प्रवास अवघ्या 10 मिनिटात… नागपुरात सर्वात लांबीचा फ्लायओव्हर; देशभर चर्चा

नागपुरातील सर्वात लांब इंदोरा-दिघोरी 'हेडगेवार उड्डाणपुला'चे उद्घाटन करण्यात आलं आहे. UHPFRC तंत्रज्ञानाने बांधलेल्या या पुलामुळे एक तासाचा प्रवास अवघ्या 10 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. यामुळे नागपूरची वाहतूक कोंडी कमी होऊन शहराच्या पायाभूत सुविधांना गती मिळेल.

Special Story : आता एक तासाचा प्रवास अवघ्या 10 मिनिटात... नागपुरात सर्वात लांबीचा फ्लायओव्हर; देशभर चर्चा
Nagpur's Longest FlyoverImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 21, 2026 | 3:06 PM
Share

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात एका फ्लायओव्हरचं उद्घाटन केलं आहे. हा उड्डाणपूल सध्या चर्चेचा विषय बनला आहे. हा पूल अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रीइन्फोर्स्ड काँक्रिट (UHPFRC) टेक्नॉलॉजीने बनवला आहे. इंदोरा चौक-दिघोरी फ्लायओव्हरची खासियत म्हणजे हा पूल इको फ्रेंडली असणार आहे. नॅशनल हायवे नंबर 353D वरील सुमारे 8.9 किलोमीटर लांबीचा हा इंदोरा चौक-दिघोरी उड्डाणपुलाने नागपूरच्या उत्तर आणि दक्षिणेकडील भागाला जोडलं आहे. नागपुरातील हा सर्वात मोठ्या लांबीचा आणि महागडा एलिव्हेटेड कॉरिडोअर आहे. या पुलामुळे एक तासाचा प्रवास अवघ्या 10 मिनिटात पार पाडता येणार आहे. त्यामुळे या पुलाची देशभर चर्चा सुरू झाली आहे.

नागपूरच्या सुरेश भट्ट सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी या उड्डाण पुलाची खासियत आणि वैशिष्ट्ये सांगितली. UHPFRC तंत्रज्ञानाच्या वापराने दोन खांबाच्या मध्ये मोठा स्पॅन तयार करणं कठिण झालं होतं. त्यामुळे त्यात स्ट्रक्चरल सेगमेंटच्या एकाच जोडीचा वापर करण्यात आला. यामुळे आवश्यक आधारांची (स्पोर्ट) संख्या कमी झाली. परिणामी उड्डाणपुलाचं काम वेगाने होऊ शकलं, असं नितीन गडकरी म्हणाले.

अवघ्या 15 मिनिटात पोहोचा

इंदोराहून दिघोरीला रस्ते मार्गाने जाताना सुमारे एक तास लागायचा. आता नव्या उड्डाणपुलामुळे वेळेची बचत होणार आहे. आता केवळ 10 ते 15 मिनिटात तुम्हाला इंदोरावरून दिघोरीला जाता येणार आहे. या उड्डाणपुलाचं बांधकाम नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाने केलं आहे. त्यासाठी सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

खास डिझाइन

हा उड्डाणपूल अशोक स्क्वॉयरवर पाच दिशांना जोडतो. पुलाच्या जंक्शनवर एक अशोक स्तंभ उभारण्यात आला आहे. सोबतच संविधानाची थीम असलेली पेटिंग आणि आकर्षक लायटिंग सुद्धा करण्यात आली आहे. या फ्लायओव्हर कॉरिडोअरमुळे सध्याच्या रस्त्यांची नावे बदललेली नाहीत. माझ्या मते, हे मल्टि-लेअर्ड स्ट्रक्चर आहे. मग तीन लेअर असो की चार लेअर असो यामुळे नागपूरची खास ओळख बनली आहे, असं त्यांनी सांगितलं.

हेडगेवारांचं नाव

इंदोरा चौक ते पंचपाओली चौकापर्यंतच्या रस्त्याचं नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आहे. हे नाव कायम राहील. फक्त उड्डाणपुलाचं नाव डॉ. हेडगेवार फ्लायओव्हर ठेवलं आहे. तसेच अशोक चौकाचं नावही अशोक चौकच राहणार आहे. या चौकाचं नुतनीकरणही करण्यात आलं आहे. तर रेशमबाग चौकाचं नाव हे जनरल मंचरशा अवारी चौकच राहणार आहे, असंही गडकरी यांनी स्पष्ट केलं.

तीन ठिकाणी रँप तयार

डागा हॉस्पिटल, रेशमबाग चौक आणि बडा ताजबागमध्ये रँप बनवण्यात आले आहेत. या सुविधेमुळे गांधीबाग आणि पंचपाओली सारख्या अधिक लोकसंख्येच्या भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. अग्रसेन चौकावर मेट्रो कॉरिडोअरच्यावर एलिव्हेटेड पॅसेज बनवण्यात आला आहे. त्यामुळे मल्टी लेन ट्रॅफिक मूव्हमेंट सोप्या होणार आहेत. नागपूर शहरातील वर्धा रोड आणि कामठी रोडवर जशी व्यवस्था आहे, तशीच व्यवस्था होणार आहे.

म्हणून हेडगेवारांचं नाव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने या उड्डाणपुलाला संघाचे संस्थापक, सरसंघचालक डॉ. केशव बळिराम हेगडेवार यांचं नाव देण्यात आलं आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

शहरात पर्यावरण अनुकूल प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात नागपूर आंतरराष्ट्रीय स्टँडर्डच्या शहरात गणलं जाईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूरच्या चारही बाजूला 148 किलोमीटर लांब गोल्डन आर्च रिंग रोड बनवण्यात येत आहे. यामुळे शहराचं विस्तारिकरण होणार आहे. नागपूरमध्ये सध्या 35 उड्डाणपूल आहेत. तर अजून 15 उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. या पायाभूत सुविधांमुळे नागपूरचा विकास अधिक वेगाने आणि गतीमानपणे होणार आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

Follow Us
TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन
Devendra Fadnavis : TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन, दुष्काळाचं सावट दूर करण्यासाठी गणरायाला घातलं साकडं
महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? भरणेंनी काय दिलं आश्वासन
Maharashtra Drought | महाराष्ट्रात 100 टक्के दुष्काळ जाहीर होणार? मंत्री बाबासाहेब पाटलांची मोठी माहिती; पण दत्तात्रय भरणेंनी काय दिलं आश्वासन
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
Solapur | काजू-बदाम नको, शेतकऱ्यांना मदत हवी; करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
Mira Road | फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण जखमी, पण घटनास्थळी वेगळंच सत्य समोर
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल