Delhi Viral Post : दिल्लीच्या पठ्ठयाने बायकोसाठी iPhone 18 Pro Max घेण्यासाठी विकलं खानदानी सोने; हर्ष गोयंकांची पोस्ट Viral
दिल्लीतील एका व्यक्तीने पत्नीला Burgundy रंगाचा iPhone 18 Pro Max देण्यासाठी कुटुंबाकडून वारशाने मिळालेले सोने विकल्याचा दावा केला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडिओवर उद्योगपती हर्ष गोएंका यांनी प्रतिक्रिया देत पोस्ट शेअर केली

iPhone घ्यायचा म्हटला की पहिला विचार येतो तो बजेटचा , मग EMI कसा भरायचा हा प्रश्न येतो. म्हणजेच काय मिडल क्लास माणूसाने iPhone घ्यायचे ठरवले तर त्याला १० वेळा विचार करावा लागतो. पण दिल्लीच्या एका पठ्ठ्याने iPhone घेण्यासाठी अस काही केलं की सर्वांचे डोळे चक्रावले.
बायकोला iPhone द्यायचा होता…म्हणून नवऱ्याने घराण्याच्या पारंपरिक दागिन्यांवरच डल्ला मारला. पत्नीला महागडा iPhone घेऊन देण्यासाठी दिल्लीतील एका व्यक्तीने जुने पारंपरिक दागिने विकले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यातच आता या व्हायरल व्हिडिओवर प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी देखील आपले मत मांडले आहे.
पत्नीला हवा होता बर्गंडी रंगाचा iPhone
iPhone 18 pro max लाँच होण्याच्या पहिल्याच दिवशी अॅपल स्टोरबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. नोएडातील डीएलएफ मॉल ऑफ इंडिया येथील अॅपल स्टोर बाहेर ग्राहकांची मोठी रांग लागली होती. याच रांगेत उभ्या असलेल्या एका व्यक्तीने बायकोसाठी iPhone घेतोय असे सांगितले. इतका महागडा iPhone विकत घेण्यासाठी पैसे कसे जमा केले असे विचारले असता त्याने पारंपरिक दागिने विकल्याचे सांगितले.
हर्ष गोयंका यांनी केली पोस्ट शेअर
हर्ष गोयंका यांनी पोस्ट शेअर करत आपले मत मांडले त्यामुळे वातावरण थोडेसे तापलेले दिसले. उद्योगपती हर्ष गोयंका यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की ” काही लोक घर खरेदी करण्यासाठी घर विकतात, काही लोक मुलांच्या शिक्षणासाठी घर विकतात. मात्र या व्यक्तीने आपल्या पत्नीला iPhone 18 pro max विकत घेण्यासाठी पारंपरिक दागिने विकले.
Some people sell gold to buy a house. Some sell it for their children’s future. This Delhi man sold family gold passed down from his grandmother and great-grandmother to buy his wife an iPhone 18 Pro Max.🙈 pic.twitter.com/MVSUEtmfSB
— Harsh Goenka (@hvgoenka) September 18, 2026
हर्ष गोयंका यांच्या पोस्टनंतर रंगल्या चर्चा
हर्ष गोयंका यांनी शेअर केलेल्या पोस्टनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही जणांना दागिने विकून महागडा फोन घेण्याच्या निर्णय काही पटलेला नाही. तर काहींनी फोन ही व्यक्तीची वैयक्तिक निवड असल्याचे म्हणत त्याचा बचाव केला. काही यूजर्सना हा प्रकार प्रसिद्धिसाठी केला असल्याची शक्यताही व्यक्त केली आहे.
