AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : ड्वेन ब्राव्होने केलेला ‘वाथी कमिंग’ गाण्यावरचा डान्स पाहिलात का?, अंबाती रायुडूही हसून लोटपोट!

अश्विनची विकेट मिळाल्यानंतर ब्राव्होने वाथी कमिंग गाण्यावर ताल धरत आपला आनंद साजरा केला. ब्राव्होच्या डान्स स्टेप्सने रायुडूलाही हसू अनावर झालं नव्हे तो हसून लोटपोट झाला. (IPL 2021 CSK vs PBKS Dwayne Bravo Vaathi Coming Dance)

IPL 2021 : ड्वेन ब्राव्होने केलेला 'वाथी कमिंग' गाण्यावरचा डान्स पाहिलात का?, अंबाती रायुडूही हसून लोटपोट!
चेन्नईच्या ड्वेन ब्राव्होचा वाथी कमिंगवर डान्स
| Updated on: Apr 17, 2021 | 3:23 PM
Share

मुंबई :  चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) या दोन संघादरम्यान आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) आठवी लढत पार पडली. या लढतीत धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई संघाने राहुलच्या (KL Rahul) पंजाब संघावर 6 विकेट्सने मात केली. या मॅचमध्ये दीपक चहरबरोबर चेन्नईच्या ड्वेन ब्राव्होचा (Dwyane Bravo) देखील जलवा पाहायला मिळाला. त्याने 2 ओव्हर्सचा अतिशय शानदार स्पेल टाकला. याचदरम्यान एक विकेट मिळाल्यानंतर त्याने वाथी कमिंग गाण्यावर थिरकत आपला आनंद साजरा केला. ब्राव्होच्या डान्स स्टेप्सने रायुडूलाही हसू अनावर झालं नव्हे तो हसून लोटपोट झाला. (IPL 2021 CSK vs PBKS Dwayne Bravo Vaathi Coming Dance Ambati Rayudu Laugh)

ब्राव्होचा ‘चिकट’ स्पेल

पंजाबविरुद्धच्या सामन्यात ब्राव्होने 2 ओव्हर टाकल्या. या 2 ओव्हरमध्ये त्याने केवळ 10 रन्स दिले. या बदल्यात त्याने एक विकेट घेतली. ब्राव्हो आपल्या स्लो बॉलने अनेक दिग्गजांना चकवा देत असतो. पंजाबच्या फलंदाजांना त्याने असाच चकवा देत मोठे शॉट खेळण्यापासून रोखलं. अगोदरच 5 ते 6 बॅट्समन तंबूत परतलेल्या पंजाबच्या बॅट्समनने ब्राव्हो विरुद्ध रिस्क घेतली नाही.

वाथी कमिंग गाण्यावर ब्राव्होचा डान्स

ड्वेन ब्राव्होने 17 व्या ओव्हर्सच्या 5 व्या बॉलवर मुरुगन अश्विनला डु प्लेसीसच्या हाती कॅच द्यायला भाग पाडलं. डु प्लेसीसने कॅच घेताक्षणी या मोसमातली ब्राव्होला पहिली विकेट मिळाली. त्याने आपला आनंद वाथी कमिंग गाण्यावर डान्स करत साजरा केला.

View this post on Instagram

A post shared by Salt Snap (@salt_snap)

ब्राव्होची स्टेप पाहून रायुडूच्या चेहऱ्यावर हसू

अश्विनची विकेट घेतल्यानंतर ब्राव्होने वाथी कमिंगची एक स्टेप केली. हे पाहून विकेट्सचं सेलिब्रेशन करायला आलेल्या अंबातीलाही हसू अनावर झालं. त्यानेही मोठ्याने हसत आणि ब्राव्होला टाळी देत अश्विनच्या विकेट्सचं सेलिब्रेशन केलं.

CSK च्या गोटात मौज-मजा, नाच-गाणं, ‘वाथी’ गाण्यावर कुणी कुणी धरला ताल?

आयपीएलचं मोसम सुरु होण्याअगोदर प्रत्येक संघाचा एक कॅम्प आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सीएसकेच्या कॅम्पमध्ये मौज मजा, धमाल मस्ती आणि नाचगाणं चालू असलेला व्हिडीओ खुद्द चेन्नईच्या इन्स्टाग्राम हँडलने शेअर केला होता. दाक्षिणात्य सिनेमातील लोकप्रिय ‘मास्टर’ सिनेमातील वाथी कमिंग गीतावर चेन्नईचे खेळाडू डान्स करताना दिसून आले.

डान्स करणारे कोण कोण खेळाडू?

वाथी कमिंग हे दक्षिणेतलं लोकप्रिय गीत… या गीताची भुरळ अनेकांना पडलीय. हे गीत वाजायला लागलं की अनेकांचे पाय ठेका धरायला मजबूर होतात. चेन्नईचे युवा खेळाडू तरी कसे अपवाद असतील. याच गीतावर चेन्नईच्या साई किशोर, ऋतुराज गायकवाड, एन. जगदीशन आणि हरी निशांत या युवा खेळाडूंनी ताल धरला.

(IPL 2021 CSK vs PBKS Dwayne Bravo Vaathi Coming Dance Ambati Rayudu Laugh)

हे ही वाचा :

IPL 2021 MI vs SRH : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, सामना कधी, कुठे, केव्हा?

IPL 2021 : ‘धोनीला म्हातारपणाची जाणीव’, 200 सामने पूर्ण करताच मोठं वक्तव्य, पाहा व्हिडीओ…

IPL 2021 : चेन्नईविरुद्धची मॅच गमावल्यानंतर के एल राहुलला दु:ख, म्हणतो, ‘माझ्याजवळ बोलायला…’

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.