AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 | ठरलं, आयपीएलच्या आगामी 14 व्या मोसमाचं आयोजन भारतातच

कोरोनामुळे आयपीएलच्या या 13 मोसमाचं आयोजन यूएईमध्ये करण्यात आलं होतं.

IPL 2021 | ठरलं, आयपीएलच्या आगामी 14 व्या मोसमाचं आयोजन भारतातच
आयपीएल ट्रॉफी
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jan 31, 2021 | 2:50 PM
Share

मुंबई : बहुप्रतिक्षित आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं आयोजन (IPL 2021) भारतात करण्यात येणार आहे. या मोसमाला एप्रिल महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात होऊ शकते. तसेच साखळी सामन्यांचे आयोजन मुंबई आणि मुंबईलगत असलेल्या स्टेडियममध्ये करण्यात येणार आहे. याबाबतचे वृत्त इंग्रजी वृत्तपत्र टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. मात्र अजूनही बीसीसीआयकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.  (ipl 2021 to likely held commence from 2nd week of april and it ll be staged in india)

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आयपीएलच्या 13 व्या मोसमाला काही महिन्यांच्या विलंबाने सुरुवात झाली होती. या 13 मोसमाचं आयोजन यूएईमध्ये करण्यात आलं होतं. त्यामुळे या 14 व्या मोसमाचं आयोजन भारतात होणार की आणखी कुठे, असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला होता. मात्र आता 14 वा मोसम भारतात खेळण्यात येणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे.

मुंबई नजीकच्या परिसरात साखळी सामने

टीओआयनुसार, आयपीएलच्या 14 व्या मोसमातील साखळी फेरीतील सामन्यांचे आयोजन मुंबई आणि मुंबईनजीकच्या स्टेडियममध्ये करण्यात येणार आहे. मुंबई आणि नजीकच्या परिसरात बरेच स्टेडियम असल्याने बीसीसीआयने मुंबईत साखळी सामने खेळवण्यास पसंती दिली आहे. मुंबईतील वानखेडे, बेब्रॉन स्टेडियम, नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियम तर पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये हे साखळी सामने खेळले जाणार आहेत. तसेच अहमदाबादमधील मोटेरा आणि सरदार पटेल स्टेडियममध्ये बाद फेरीतील (Knock Out) सामन्यांचं आयोजन केलं जाणार असल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

गांगुली काय म्हणाला होता?

“फेब्रुवारी 2021 पर्यंत कोरोनावर लस सापडल्यास नक्कीच या आगामी पर्वाचं आयोजन भारतात केलं जाईल”, असा आशावाद बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने काही महिन्यांपूर्वी व्यक्त केला होता.

लिलाव प्रक्रिया 18 फेब्रुवारीला

आगामी 14 व्या मोसमासाठीची लिलाव प्रक्रिया ही 18 फेब्रुवारीला चेन्नईत पार पडणार आहे. याबाबतची माहिती आयपीएल प्रशासनाने काही दिवसांपूर्वी ट्विटद्वारे दिली होती. या लिलाव प्रक्रियेसाठी प्रत्येक फ्रँचायजीने आपल्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामुळे या लिलाव प्रक्रियेत कोणता खेळाडू हा महागडा ठरणार याकडे क्रिकेट चाहत्यांच लक्ष असणार आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2021 Auction Date | IPL 2021 च्या लिलावाची जय्यत तयारी, तारीख आणि ठिकाण ठरलं

(ipl 2021 to likely held commence from 2nd week of april and it ll be staged in india)

Follow Us
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी