IPL 2021 Auction Date | IPL 2021 च्या लिलावाची जय्यत तयारी, तारीख आणि ठिकाण ठरलं

आयपीएलने ट्विट (IPL 2021 Auction Date) करत याबाबतची माहिती दिली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:38 PM, 27 Jan 2021
IPL 2021 Auction Date | IPL 2021 च्या लिलावाची जय्यत तयारी, तारीख आणि ठिकाण ठरलं
आयपीएल ट्रॉफी

चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) हंगामाची अनेक क्रिकेट चाहते आवर्जून वाट पाहत आहेत. या 14 व्या मोसमासाठीच्या लिलाव प्रक्रियेची तारीख आणि ठिकाण ठरलं आहे. ही लिलाव प्रक्रिया 18 फेब्रुवारीला होणार (IPL 2021 Auction Date) आहे. हा कार्यक्रम चेन्नईमध्ये पार पडणार आहे. याबाबतची माहिती आयपीएलने ट्विटद्वारे दिली आहे. या मोसमासाठीची लिलाव प्रक्रिया कधी होणार, याबाबत जोरदार चर्चा काही दिवसांपासून क्रिकेट वर्तुळात सुरु होती. मात्र आयपीएलने तारीख जाहीर केल्याने या चर्चेला आता पूर्णविराम मिळालं आहे.(IPL 2021 Auction on 18th February at chennai)

या लिलाव प्रक्रियेसाठी काही दिवसांपूर्वी सर्व फ्रँचायजीने आपल्या ताफ्यातील रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर केली होती. तसेच काही संघांनी ट्रान्सफर विंडोद्वारे काही खेळाडूंची अदलाबदलही केली आहे.

मिचेल स्टार्क महागडा खेळाडू ठरणार – आकाश चोप्रा

“ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा या 14 व्या पर्वातील महागडा खेळाडू ठरेल”, अशी भविष्यवाणी टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्राने काही दिवसांपूर्वी केली. पण स्टार्कला नक्की किती कोटी मिळतील, तो आकडा आकाशने सांगितला नाही. स्टार्क आतापर्यंत आयपीएलमधील 27 सामन्यात खेळला आहे. यामध्ये त्याने 20.38 च्या सरासरीने 34 विकेट्स घेतल्या आहेत.

14 व्या मोसमाचं आयोजन कुठे?

कोरोनामुळे 13 व्या मोसमाचं आयोजन यूएईमध्ये करण्यात आलं होतं. यामुळे आयपीएलच्या आगामी 14 पर्वाचं आयोजन कुठे होणार, हा मोठा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. फेब्रुवारी 2021 पर्यंत कोरोनावर लस सापडल्यास नक्कीच या आगामी पर्वाचं आयोजन भारतात केलं जाईल, असा आशावाद बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने काही महिन्यांपूर्वी व्यक्त केला होता. आता कोरोना लस सापडली आहे. यामुळे या 14 मोसमाचं आयोजन हे नक्कीच भारतात केलं जाईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

IPL 2021 | “अष्टपैलू बेन स्टोक्सला ‘मुंबई इंडियन्स’च्या ताफ्यात घ्या”

IPL 2021 | ना कोच, ना मेन्टॉर, कुमार संगकाराची राजस्थान रॉयल्सच्या मोठ्या पदावर निवड

IPL 2021 Auction | ‘हा’ खेळाडू सर्वात महागडा ठरणार, ‘आकाशवाणी’ची भविष्यवाणी

‘रिस्क है तो इश्क है’; सलग दोन वर्ष IPL मध्ये फ्लॉप ठरलेला ‘हा’ खेळाडू चेन्नईने खरेदी केला

(IPL 2021 Auction on 18th February at chennai)