‘रिस्क है तो इश्क है’; सलग दोन वर्ष IPL मध्ये फ्लॉप ठरलेला ‘हा’ खेळाडू चेन्नईने खरेदी केला

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. आयपीएलमधील आठ संघांकडून त्यांच्याकडील खेळाडू आणि संघातून मुक्त करणात आलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे.

'रिस्क है तो इश्क है'; सलग दोन वर्ष IPL मध्ये फ्लॉप ठरलेला 'हा' खेळाडू चेन्नईने खरेदी केला
Follow us
| Updated on: Jan 21, 2021 | 11:17 PM

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. आयपीएलमधील आठ संघांकडून त्यांच्याकडील खेळाडू आणि संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. आयपीएलमधील आठ संघ चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायजर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स या संघांनी अनेक खेळाडूंना मुक्त केलं आहे, तर संघातील महत्त्वाच्या खेळाडूंना कायम ठेवलं आहे. दरम्यान राजस्थान रॉयल्सने गुरुवारी ट्रेडिंग नियमानुसार (खेळाडूंची अदलाबदली) रॉबिन उथप्पाला चेन्नई सुपरकिंग्स संघाकडे सोपवलं आहे. त्यामुळे उथप्पा आयपीएल 2021 मध्ये चेन्नई सुपरकिंग्स संघाकडून खेळणार आहे. (Robin Uthappa traded to Chennai super kings from Rajasthan royals)

35 वर्षीय रॉबिन उथप्पाला गेल्या वर्षीच्या लिलावात राजस्थान रॉयल्सने 3 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. उथप्पा यापूर्वी मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, पुणे वॉरियर्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांकडून खेळला आहे. उथप्पाने आतापर्यंत आयपीएलमध्ये 189 सामन्यांमध्ये 129.99 च्या स्ट्राईक रेटने 4607 धावा जमवल्या आहेत. यामध्ये त्याच्या नावे 24 अर्धशतकं आहेत. उथप्पाने आयपीएलच्या 2014 च्या मोसमात ऑरेंज कॅप जिंकली होती. त्यावर्षी उथप्पाने कोलकात्याच्या संघाला विजेतेपद मिळवून दिलं होतं. उथप्पा 2008 पासून आयपीएल खेळतोय.

उथप्पाची दोन वर्षांपासून निराशानजक कामगिरी

गेल्या दोन वर्षांमध्ये उथप्पाची आयपीएलमधील कामगिरी निराशानाजनक होती. 2019 मध्ये कोलकात्याकडून खेळताना उथप्पाने 115.1 च्या स्ट्राईक रेटने केवळ 282 धावा जमवल्या होत्या. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने त्याला आपल्या संघात सामावून घेतलं. परंतु 2020 मध्येदेखील उथप्पाने पुन्हा निराशाजनक कामगिरी केली उथप्पाने आयपीएल 2020 मध्ये 119.51 च्या स्ट्राईक रेटने केवळ 196 धावा जमवल्या.

चेन्नईने उथप्पाला का खरेदी केलं?

सर्वांना प्रश्न पडला आहे. की निराशाजनक कामगिरीनंतरही चेन्नईने उथप्पाला त्यांच्या संघात का घेतलं असेल? त्यावर काही जणांचं असं मत आहे की, चेन्नईला चांगला सलामीवीर हवा आहे. त्यामुळे त्यांनी उथप्पाला खरेदी केलं आहे. चेन्नईकडून सलामीवीर म्हणून खेळणाऱ्या शेन वॉट्सनने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तसेच चेन्नईने मुरली विजयला नुकतेच संघमुक्त केलं आहे. सध्या चेन्नईकडे सलामीवीर म्हणून ऋतुराज गायकवाड हा एकच चांगला पर्याय आहे. तसेच फॅफ डु प्लेसी, अंबाती रायुडू, एन जगदीशन आणि सॅम करन हे सलामीला खेळू शकतात. परंतु ऋतुराजच्या सोबत सलामीला उतरवण्यासाठी सीएसकेला एक भरवशाचा खेळाडून हवा आहे.

चेन्नई सुपरकिंग्जने संघात कायम ठेवलेले खेळाडू (CSK Players Retained) : महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, फॅफ ड्यू प्लेसिस, शार्दूल ठाकूर, इम्रान ताहीर, अंबाती रायुडू, एन जगदीसन, ऋतुराज गायकवाड, के आसीफ, रवींद्र जाडेजा, जोश हेझलवूड, कर्ण शर्मा, दीपक चाहर, मिचेल सँटनर, ड्वेन ब्राव्हो, लुंगी एनगिडी, सॅम कुरन, रविश्रीनिवासन साई किशोर,

चेन्नई सुपरकिंग्जने संघमुक्त केलेले खेळाडू (CSK Players Released) : केदार जाधव, पियूष चावला, मुरली विजय, हरभजन सिंह, शेन वॉटसन, मोनू सिंग

संबंधित बातम्या

पंजाबकडून मॅक्सवेलला डच्चू, बंगळुरुकडून फिंचची उचलबांगडी, सर्व संघाच्या खेळाडूंची संपूर्ण यादी

चेन्नईकडून केदार जाधवला नारळ, आता बोली कोण लावणार?

RR Released Players IPL 2021 : स्टीव्ह स्मिथला डच्चू, धडाकेबाज संजू सॅमसनची थेट कर्णधारपदी निवड

IPL Retained and Released Players 2021 LIVE: लसिथ मलिंगासह 7 खेळाडू मुक्त, मुंबई इंडियन्सच्या संघात कोण कोण उरले?

Kedar Jadhav | आधी सोशल मीडियावर ट्रोल, आता केदार जाधवच्या नावे नकोसा विक्रम

(Robin Uthappa traded to Chennai super kings from Rajasthan royals)

Non Stop LIVE Update
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.