Mumbai Indians Dewald Brevis: बेबी एबीने जसप्रीत बुमराहसमोर हार नाही मानली, स्वत:च टॅलेंट दाखवून दिलं, पहा VIDEO

| Updated on: Mar 22, 2022 | 1:49 PM

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा (IPL 2022) सुरु व्हायला आता फक्त चार दिवस उरले आहेत. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) नव्याने संघाची बांधणी केली असून अनेक नवखे खेळाडू मुंबईच्या टीममधून खेळताना दिसणार आहेत.

Mumbai Indians Dewald Brevis: बेबी एबीने जसप्रीत बुमराहसमोर हार नाही मानली, स्वत:च टॅलेंट दाखवून दिलं, पहा VIDEO
मुंबई इंडियन्सच्या नेट्समध्ये जसप्रीत बुमराह, डेवाल्ड ब्रेविस
Image Credit source: MI TWITTER
Follow us on

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा (IPL 2022) सुरु व्हायला आता फक्त चार दिवस उरले आहेत. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) नव्याने संघाची बांधणी केली असून अनेक नवखे खेळाडू मुंबईच्या टीममधून खेळताना दिसणार आहेत. आयपीएल स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच मुंबई इंडियन्स संघातील डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) या खेळाडूची बरीच चर्चा आहे. त्याला बेबी एबी म्हणतात. कारण त्याच्या खेळात दक्षिण आफ्रिकेचा महान क्रिकेटपटू एबी डिविलियर्सची झलक दिसते. बेबी एबीच्या बॅटमधून निघणारे चौकार, षटकार पाहून डिविलियर्सची आठवण येते. अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार खेळाची झलक दाखवणार डेवाल्ड ब्रेविस आता मुंबई इंडियन्सचा भाग आहे. या खेळाडूला मुंबईने आयपीएल 2022 मेगा ऑक्शनमध्ये तीन कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं आहे.

नेट्समध्ये बुमराह बरोबर झाला सामना
डेवाल्ड ब्रेविसमध्ये जबरदस्त टॅलेंट आहे, यात कुठलीही शंका नाही. सोमवारी मुंबई इंडियन्सच्या नेट सेशनमध्ये त्याची झलक दिसली. मुंबई इंडियन्सच्या नेट सेशनमध्ये ब्रेविसचा थेट सामना जसप्रीत बुमराह बरोबर झाला. जसप्रीत बुमराह सोमवारी नेट्समध्ये भेदक गोलंदाजी करत होता. सर्वात आधी त्याने कायरन पोलार्डला गोलंदाजी केली. त्याचं फलंदाजीचं सत्र संपल्यानंतर डेवाल्ड ब्रेविस नेट्समध्ये फलंदाजीसाठी उतरला.

आधी बेबी थोडा नर्वस होता

ब्रेविस आधी थोडा नर्वस वाटला. पण त्यानंतर त्याने बुमराहच्या गोलंदाजीवर काही सुंदर फटके खेळले. त्याने दुसऱ्या गोलंदाजांही सामना केला. बॅटिंग करताना त्याच्यामध्ये एक आत्मविश्वास दिसत होता. चेंडू बॅटच्या बरोबर मधोमध लागत होता.

ब्रेविसचे आकडे काय सांगतात?

डेवाल्ड ब्रेविसने आतापर्यंत नऊ टी-20 सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने 25.87 च्या सरासरीने 207 धावा केल्या आहेत. ब्रेविसचा स्ट्राइक रेट 125 पेक्षा जास्त आहे. त्याने आतापर्यंत नऊ षटकार आणि 18 चौकार लगावले आहेत. डेवाल्ड ब्रेविसचे हे आकडे तुम्हाला कदाचित खास वाटणार नाहीत. पण तुम्ही त्याच्या अंडर 19 मधील कामगिरीवर नजर मारा. ब्रेविस या स्पर्धेतील सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू होता. ब्रेविसने 84 च्या सरासरीने 506 धावा केल्या. ब्रेविसने वर्ल्ड कप मध्ये दोन शतक आणि तीन अर्धशतक झळकावली आहेत.

सध्याचा बेबी एबीचा फॉर्म कसा आहे?

डेवाल्ड ब्रेविसचा सध्याचा फॉर्म काही विशेष नाहीय. दक्षिण आफ्रिकेतील देशातंर्गत टी 20 स्पर्धेत सात सामन्यात त्याने एकही शतक झळकावलं नाही. ब्रेविस 38 आणि 46 धावांच्या काही चांगल्या खेळी जरुर खेळला. ब्रेविसने त्याशिवाय चार विकेटही काढले. मुंबई इंडियन्स डेवाल्ड ब्रेविसला संघात स्थान देणार की, नाही या बद्दल आत्ताच सांगता येणार नाही. पण नेट्समध्ये जयवर्धने आणि रोहित शर्माला त्याच्यात टॅलेंट दिसलं, तर नक्कीच तो प्लेइंग इलेवनमध्ये खेळताना दिसेल.