AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 Auction: आयपीएल गाजवणाऱ्या वॉर्नर, डि कॉक आणि फाफ डू प्लेसीची टीम चेंज, आता ‘या’ संघाकडून दाखवणार जलवा

IPL 2022 Auction:

IPL 2022 Auction: आयपीएल गाजवणाऱ्या वॉर्नर, डि कॉक आणि फाफ डू प्लेसीची टीम चेंज, आता 'या' संघाकडून दाखवणार जलवा
| Updated on: Feb 12, 2022 | 1:51 PM
Share

बंगळुरु: आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये मार्की खेळाडूंच्या यादीत डेविड वॉर्नरचही (David warner) नाव होतं. त्याच्या नेतृत्वाखाली 2016 मध्ये सनरायजर्स हैदराबादने आयपीएलचे जेतेपद पटकावलं होतं. SRH बरोबर मतभेद झाल्याने त्याने संघाची साथ सोडली. आक्रमक आणि एकहाती सामना फिरवण्याची क्षमता वॉर्नरमध्ये आहे. त्यामुळे वॉर्नरसारखा खेळाडू आपल्या ताफ्यात हवा अशी प्रत्येक संघाचीच इच्छा असेल. वॉर्नरला दिल्ली कॅपिटल्सने (Delhi capitals) विकत घेतलं आहे. या डावखुऱ्या फलंदाजासाठी त्यांनी 6.25 कोटी रुपये मोजले. वॉर्नरसाठी तीन संघांनी बोली लावली पण अखेर दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली. वॉर्नरची बेस प्राइस दोन कोटी होती. त्यासाठी मुंबई इंडियन्स, सीएसके आणि दिल्ली कॅपिटल्सने बोली लावली. टी-20 क्रिकेटमधला सर्वात धोकादायक फलंदाज आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत त्याने 5449 धावा केल्या आहेत. 2014 मध्ये सनरायजर्स हैदराबादने 5.5 कोटी रुपयांना त्याला विकत घेतलं. 2016 मध्ये वॉर्नच्या नेतृत्वाखाली SRH ने आयपीएलचे पहिले जेतेपद पटकावले. त्याने स्वत: 848 धावा केल्या होत्या. काही कारणांमुळे त्याचं सनरायजर्स हैदराबाद बरोबर बिनसलं. त्यामुळे तो आता हैदराबादकडून खेळत नाही.

क्विंटन डि कॉक दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डि कॉकला चांगली किंमत मिळाली आहे. मागचे तीन सीजन मुंबईकडून खेळणाऱ्या या खेळाडूला लखनऊ सुपर जायंट्सने 6.75 कोटींची बोली लावून विकत घेतलं. क्विंटन डि कॉक विकेटकिपिंग आणि फलंदाजी अशा दुहेरी भूमिका बजावू शकतो. त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आयपीएल स्पर्धेत त्याने आतापर्यंत 2 हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

फाफ डू प्लेसी फाफ डू प्लेसी हा CSK चा भरवशाचा खेळाडू यंदाच्या सीजनपासून नव्या संघाकडून खेळताना दिसेल. या खेळाडूला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी CSK आणि RCB मध्ये स्पर्धा दिसून आली. अखेर आरसीबीने 7 कोटींची बोली लावून त्याला विकत घेतलं. “मागच्यावेळी सीएसकेने फाफ ड्यूप्लेसिस फक्त 1.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. पण आता तसंच होईल, असं वाटत नाही. सीएसकेच्या चाहत्यांना नक्कीच तो आपल्या संघात हवा असेल. यावेळी सीएसकेला ड्यूप्लेसिसला विकत घ्यायचे असेल, तर त्यांना मागच्यावेळपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील. माझ्या मते फाफ ड्यूप्लेसिस सारख्या खेळाडूला संघात घेण्यासाठी मोठी चुरस दिसेल” असे अश्विनने त्याच्या युट्यूब चॅनलवर म्हटलं होतं.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.