AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 MI vs PBKS Live Streaming: जाणून घ्या मुंबई विरुद्ध पंजाब सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

आयपीएल 2022 (IPL 2022) मधील 23 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज (Mumbai Indians vs Punjab Kings) यांच्यात सामना होणार आहे. हा सामना 13 एप्रिल रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे.

IPL 2022 MI vs PBKS Live Streaming: जाणून घ्या मुंबई विरुद्ध पंजाब सामना कधी आणि कुठे पाहता येईल?
Mumbai Indians vs Punjab KingsImage Credit source: IPL/Twitter
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Apr 13, 2022 | 8:00 AM
Share

मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील 23 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज (Mumbai Indians vs Punjab Kings) यांच्यात सामना होणार आहे. हा सामना 13 एप्रिल रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने अद्याप विजयाचे खाते उघडलेले नाही. मुंबईने स्पर्धेत आतापर्यंत सलग चार सामने गमावले असून गुणतालिकेत मुंबईचा संघ नवव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील पंजाबच्या संघाने चांगला खेळ दाखवला आहे. पंजाबचा संघ सध्या गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. चार सामन्यांपैकी दोन सामने त्यांनी जिंकले आहेत, तर दोन गमावले आहेत. दोन्ही संघांना मागील सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

पंजाब किंग्जचा संघ खूपच संतुलित दिसत आहे. लियाम लिव्हिंगस्टन त्यांच्यासाठी झटपट धावा करत आहे. मात्र, आतापर्यंत शिखर धवन, मयंक अग्रवाल यांच्याकडून एकही मोठी खेळी पाहायला मिळालेली नाही. जॉनी बेअरस्टोने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात पंजाबकडून पदार्पण केले. अशा स्थितीत संघाला त्याच्याकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा असेल. ओडिन स्मिथ आपली जागा कायम ठेवतो की बाहेर जातो हे पाहणे बाकी आहे. गेल्या तीन सामन्यांत तो अपयशी ठरला आहे. मुंबईबद्दल बोलायचे झाले तर त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि इशान किशन यांच्याशिवाय उर्वरित फलंदाजांना ना मैदानात टिकता आलंय ना धावा करता आल्या. पण संघासाठी सर्वात मोठी चिंता गोलंदाजीची आहे. कारण जसप्रीत बुमराहशिवाय इतर गोलंदाज सपशेल अपयशी ठरले आहेत.

MI vs PBKS, IPL 2022: मुंबई विरुद्ध पंजाब सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जमधील सामना कधी खेळवला जाणार आहे?

आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जमधील सामना 13 एप्रिलला म्हणजेच बुधवारी खेळवला जाणार आहे.

IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्जमधील सामना कुठे खेळवला जाईल?

आयपीएल 2022 मध्ये, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सामना खेळवला जाणार आहे.

आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामना कधी सुरू होईल?

आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यासाठी नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता खेळाला सुरुवात होईल.

आयपीएल 2022 मधील मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना कुठे पाहता येईल?

आयपीएल 2022 मधील मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येईल.

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?

डिस्ने+हॉटस्टार वर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जमधील सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग सदस्यत्वासह पाहू शकता. याशिवाय tv9marathi.com वरही सामन्याचे लाईव्ह अपडेट्स आणि कव्हरेज वाचता येईल.

इतर बातम्या

SRH vs GT Match Result: आज ती खूप आनंदी असेल, हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्सचं काय चुकलं?

Hardik pandya SRH vs GT: कानाजवळ उमरानचा बाऊन्सर शेकला, त्यानंतर हार्दिकने बॅटनेच दिलं प्रत्युत्तर, एक रेकॉर्डही बनवला

SRH vs GT IPL 2022: अविश्वसनीय! शुभमन गिल तरी काय करणार? राहुलने कव्हर्समध्ये घेतलेला फ्लाईंग कॅच एकदा पहाच VIDEO

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली