AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 SRH VS RR: SRH ने आज ‘तिला’ निराश केलं, जाणून घ्या रॉयल विजयाची पाच कारणं

IPL 2022 SRH VS RR: बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्सने दमदार खेळाचं प्रदर्शन केलं. त्यांनी यंदाच्या सीजनमधील 210 ही सर्वोच्च धावसंख्या नोंदवली.

IPL 2022 SRH VS RR: SRH ने आज 'तिला' निराश केलं, जाणून घ्या रॉयल विजयाची पाच कारणं
सनरायजर्स हैदराबादची मालक काव्या मारन Image Credit source: instagram
| Updated on: Mar 29, 2022 | 11:25 PM
Share

पुणे: बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्सने दमदार खेळाचं प्रदर्शन केलं. त्यांनी यंदाच्या सीजनमधील 210 ही सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. याआधी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे 206 धावांचे लक्ष्य पंजाब किंग्सने पार केलं होतं. आज सनरायजर्स हैदराबादला तशी कामगिरी करुन दाखवणं (RR vs SRH) जमलं नाही. राजस्थान रॉयल्सने त्यांचा 61 धावांनी पराभव केला व आयपीएलमध्ये विजयी शुभांरभ केला. राजस्थानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायजर्स निर्धारीत 20 षटकात सात बाद 149 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आज फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात सरस खेळ दाखवला. राजस्थानची फलंदाजी तर अफलातून झाली. यशस्वी जैसस्वालपासून हेटमायरपर्यंत तडाखेबंद खेळ पहायला मिळाला. राजस्थान रॉयल्सने हा विजय कसा मिळवला? त्यामागे काय कारणं आहेत ते जाणून घेऊया.

  1. राजस्थान रॉयल्सला सुरुवात चांगली मिळाली. भुवनेश्वर कुमारच्या नो बॉल मुळे जोस बटलरला बाद असूनही संधी मिळाली. त्याचा त्याने पुरेपूर फायदा उचलला. बटलरने उमरान मलिकच्या एका ओव्हरमध्ये 21 धावा चोपल्या. त्यानंतर पुढच्याच वॉशिंग्टन सुंदरच्या षटकात 18 धावा काढल्या. तिथून राजस्थानने सामन्यावर जी पकड मिळवली, ती शेवटपर्यंत कायम टिकवली. जोस बटलर आणि यशस्वी जैस्वालने पहिल्या विकेटसाठी 58 धावांची सलामी दिली.
  2. राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसनने हैदराबादच्या गोलंदाजांची जी धुलाई केली, त्याला तोड नाही. बटलरची महत्त्वाची विकेट गेल्यानतंरही त्याने सामन्यात सनरायजर्स हैदराबादला वरचढ होऊ दिले नाही. खेळपट्टीवर आल्यापासून फटेकबाजी सुरु केली. 27 चेंडूत 55 धावांची खेळी केली. चौकार-षटकारांमधून त्याने 42 धावा केल्या.
  3. देवदत्त पडिक्कलनेही हैदराबादच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. फक्त संजूच नाही, दुसऱ्याबाजूने देवदत्तही फटकेबाजी करत होता. एकाचवेळी दोन्ही बाजूंनी हल्लाबोल झाल्याने हैदराबादच्या गोलंदाजीची दिशा आणि टप्पा भरकटला. त्याने 29 चेंडूत 41 धावा केल्या. यात चार चौकार आणि दोन षटकार होते.
  4. प्रसिद्ध कृष्णा आणि ट्रेंट बोल्टची जोडी यंदाचं आयपीएल गाजवू शकते. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन त्यांनी पहिल्या सहा षटकातच हैदराबादच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं व मुक्तपणे फलंदाजी करु दिली नाही. तिथेच हैदराबादचा पराभव निश्चित झाला. प्रसिद्ध कृष्णाने विलियमसन आणि त्रिपाठीला तंबूत पाठवलं. ट्रेंट बोल्टने पूरनची विकेट काढली.
  5. फलंदाजीच नाही राजस्थानची गोलंदाजीही धारदार झाली. ज्या विकेटवर हैदराबादचे गोलंदाज निष्प्भ ठरले. त्याच विकेटवर राजस्थानच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करुन दाखवली. तिथेच सामना राजस्थानच्या बाजूने फिरला.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली