AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Glenn Phillips not Available ipl 2022: अजूनही SRH चा हा खेळाडू भारतात पोहोचला नाही, कुठे फसलाय ते इन्स्टाग्रामवर सांगितलं

Glenn Phillips not Available ipl 2022: सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्समध्ये (SRH vs RR) सामना सुरु आहे. पण त्याआधी सनरायजर्सला मोठा झटका बसला आहे.

Glenn Phillips not Available ipl 2022: अजूनही SRH चा हा खेळाडू भारतात पोहोचला नाही, कुठे फसलाय ते इन्स्टाग्रामवर सांगितलं
न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स अजूनही भारतात पोहोचलेला नाही Image Credit source: File photo
| Updated on: Mar 29, 2022 | 8:50 PM
Share

मुंबई: सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्समध्ये (SRH vs RR) सामना सुरु आहे. पण त्याआधी सनरायजर्सला मोठा झटका बसला आहे. न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आयपीएलचे (IPL 2022) सामने खेळू शकणार नाहीय. कारण त्याला कोविड 19 ची लागण झाली आहे. तो अजून भारतात पोहोचलेला नाही. सनराजयर्सचा राजस्थान विरुद्ध सामना सुरु आहे. सनरायजर्सने ग्लेन फिलिप्सला 1.5 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होता. त्याच्यामुळे हैदराबादची फलंदाजीची ताकत वाढणार आहे. फ्रेंचायजीने आधी फिलिप्सबद्दल माहिती दिली नव्हती. फिलिप्स कुठे आहे? त्या बद्दल प्रश्न विचारले जात होते. फिलिप्सने स्वत: इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे तो कुठे आहे? त्याची माहिती दिलीय. “अनेकजण माझ्याबद्दल विचारतायत. त्यांना मी सांगू इच्छितो की, मी अजून न्यूझीलंडमध्ये आहे. कारण मला कोरोना झालाय. लवकरात लवकर मी सनरायजर्स स्क्वाडमध्ये दाखल होईन” असे फिलिप्सने म्हटलं आहे.

हे परदेशी खेळाडू खेळत नाहीयत

आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये अनेक परदेशी खेळाडू खेळत नाहीयत. डेविड वॉर्नर, एरॉन फिंच, पॅट कमिन्स, मार्कस स्टोयनिस, जोश हेझलवूड हे आपल्या राष्ट्रीय संघाकडून खेळतायत. त्यामुळे ते सुरुवातीच्या सामन्यामध्ये दिसले नाहीत. दक्षिण आफ्रिकेचेही काही खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी दाखल झालेले नाहीत.

फिलिप्सच्या अनुपस्थितीत ‘या’ खेळाडूंवर जबाबदारी

फिलिप्स उपलब्ध नसल्यामुळे एडन मार्कराम आणि केन विलियमसनवर जबाबदारी आहे. फिलिप्सची कमतरता संघाला जाणवू न देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. निकोलस पूरनकडेही जबाबदारी आहे. सनरायजर्स हैदराबादने 2016 पासून एकदाही किताब जिंकलेला नाही. 2018 मध्ये ते एकदा फायनलमध्ये पोहोचले होते. मागच्या सीजनमध्ये संघाचं प्रदर्शन खूप खराब होतं. टीम प्लेऑफमध्येही पोहोचू शकली नव्हती. त्यामुळे टीम मॅनेजमेंटने डेविड वॉर्नरला हटवून त्याच्या जागी केन विलियमसनला कॅप्टन बनवलं.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.