AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 : Kane Williamson कॅच आऊट नव्हता, तिसऱ्या पंचांचा निर्णय चूकला? SRH चे टीम डायरेक्टर म्हणाले…

आयपीएल 2022 (IPL 2022) च्या पाचव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) एकतर्फी पराभव केला. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात हैदराबादचा 61 धावांनी पराभव झाला. या सामन्यात केन विल्यमसन झेलबाद झाल्यानंतर मोठा वादही निर्माण झाला होता.

IPL 2022 : Kane Williamson कॅच आऊट नव्हता, तिसऱ्या पंचांचा निर्णय चूकला? SRH चे टीम डायरेक्टर म्हणाले...
Kane Williamson's controversial dismissal Image Credit source: TWITTER
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Mar 30, 2022 | 12:42 PM
Share

मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) च्या पाचव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) एकतर्फी पराभव केला. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात हैदराबादचा 61 धावांनी पराभव झाला. या सामन्यात केन विल्यमसन झेलबाद झाल्यानंतर मोठा वादही निर्माण झाला होता. देवदत्त पडिक्कलने प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर विल्यमसनचा शानदार झेल टिपला होता. मैदानावरील पंचांनी विल्यमसनला आऊट देण्यापूर्वी तिसऱ्या पंचाचा सल्ला घेतला आणि तेथेही सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधाराच्या विरोधात निर्णय आला.

विल्यमसनला बाद घोषित केले पण सनरायझर्स हैदराबाद कॅम्पने त्यावर विश्वास ठेवला नाही. टीम डायरेक्टर टॉम मूडी म्हणतात की, विल्यमसनला बाद घोषित केल्याने त्यांना धक्का बसला होता. प्रसिद्ध कृष्णाचा चेंडू विल्यमसनच्या बॅटच्या बाहेरच्या काठावर आदळला आणि चेंडू यष्टीरक्षक संजू सॅमसनच्या ग्लोव्हजला लागला आणि स्लिपमध्ये उभ्या असलेल्या पडिक्कलच्या दिशेने गेला. चेंडू पडिक्कलच्या थोडा पुढे होता, त्यामुळे या खेळाडूला झेल टिपण्यासाठी डाइव्ह मारावी लागली. रिप्ले दरम्यान, चेंडू जमिनीला लागून पडिक्कलच्या हातात विसावला असल्याचे दिसून आले, परंतु तिसऱ्या पंचांना वाटत होते की, पडिक्कलची बोटे चेंडूखाली होती. त्यामुळेच त्यांनी विलियमसनला बाद घोषित केले.

हैदराबादसमोर राजस्थानचा धावांचा डोंगर

राजस्थान रॉयल्सने मंगळवारी दमदार खेळाचं प्रदर्शन केलं. त्यांनी यंदाच्या सीजनमधील 210 ही सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. याआधी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे 206 धावांचे लक्ष्य पंजाब किंग्सने पार केलं होतं. सनरायजर्स हैदराबादला तशी कामगिरी करुन दाखवणं जमलं नाही. राजस्थान रॉयल्सने त्यांचा 61 धावांनी पराभव केला व आयपीएलमध्ये विजयी शुभांरभ केला. राजस्थानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायजर्स निर्धारीत 20 षटकात सात बाद 149 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागात सरस खेळ दाखवला. सलामीवीर यशस्वी जैसस्वालपासून शिमरन हेटमायरपर्यंत प्रत्येकाचा तडाखेबंद खेळ पहायला मिळाला.

भूवनेश्वरच्या नो बॉलने नुकसान केलं

राजस्थान रॉयल्सला सुरुवात चांगली मिळाली. भुवनेश्वर कुमारच्या नो बॉल मुळे जॉस बटलरला बाद असूनही एक संधी मिळाली. त्याचा त्याने पुरेपूर फायदा उचलला. बटलरने उमरान मलिकच्या एका ओव्हरमध्ये 21 धावा चोपल्या. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरच्या षटकात 18 धावा काढल्या. तिथून राजस्थानने सामन्यावर जी पकड मिळवली, ती शेवटपर्यंत कायम टिकवली. जॉस बटलर आणि यशस्वी जैस्वालने पहिल्या विकेटसाठी 58 धावांची सलामी दिली.

संजू देवदत्तची फटकेबाजी

राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसनने हैदराबादच्या गोलंदाजांची जी धुलाई केली, त्याला तोड नाही. बटलरची महत्त्वाची विकेट गेल्यानतंरही त्याने सामन्यात सनरायजर्स हैदराबादला वरचढ होऊ दिले नाही. खेळपट्टीवर आल्यापासून फटेकबाजी सुरु केली. 27 चेंडूत 55 धावांची खेळी केली. चौकार-षटकारांमधून त्याने 42 धावा केल्या. त्यापाठोपाठ देवदत्त पडिक्कलनेही हैदराबादच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. फक्त संजूच नाही, दुसऱ्या बाजूने देवदत्तही फटकेबाजी करत होता. एकाचवेळी दोन्ही बाजूंनी हल्लाबोल झाल्याने हैदराबादच्या गोलंदाजीची दिशा आणि टप्पा भरकटला. त्याने 29 चेंडूत 41 धावा केल्या. यात चार चौकार आणि दोन षटकार होते.

हैदराबादची पडझड

प्रसिद्ध कृष्णा आणि ट्रेंट बोल्टची जोडी यंदाचं आयपीएल गाजवू शकते. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन त्यांनी पहिल्या सहा षटकातच हैदराबादच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं व मुक्तपणे फलंदाजी करु दिली नाही. तिथेच हैदराबादचा पराभव निश्चित झाला. प्रसिद्ध कृष्णाने विलियमसन आणि त्रिपाठीला तंबूत पाठवलं. ट्रेंट बोल्टने पूरनची विकेट काढली. फलंदाजीच नाही राजस्थानची गोलंदाजीही धारदार झाली. ज्या विकेटवर हैदराबादचे गोलंदाज निष्प्भ ठरले. त्याच विकेटवर राजस्थानच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करुन दाखवली. तिथेच सामना राजस्थानच्या बाजूने फिरला.

इतर बातम्या

Rohit Sharma Fined, IPL 2022: Mumbai Indians ला दुहेरी फटका, रोहितला भरावा लागला 12 लाखाचा दंड

IPL 2022 Points Table मध्ये कुठली टीम कुठल्या स्थानावर, Mumbai indians सह पराभूत संघांची स्थिती काय जाणून घेऊया….

RCB vs KKR IPL 2022 Match Prediction: RCB पराभवातून उसळी घेईल? आज श्रेयसच्या KKR शी भिडणार

Follow Us
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत; उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत;  उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी सांगितलं बैठकीत काय घडलं?
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर....
Parbhani | परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर, गावकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक!
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ!