IPL 2022 Points Table मध्ये कुठली टीम कुठल्या स्थानावर, Mumbai indians सह पराभूत संघांची स्थिती काय जाणून घेऊया….

IPL 2022 Points Table मध्ये कुठली टीम कुठल्या स्थानावर, Mumbai indians सह पराभूत संघांची स्थिती काय जाणून घेऊया....
IPL 2022 Points Table कुठला संघ कुठल्या स्थानावर
Image Credit source: ipl/bcci

IPL 2022 Points Table : बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेची (IPL) जोरदार सुरुवात झाली आहे. 26 मार्च ते 29 मार्च म्हणजे शनिवार ते मंगळवार या चार दिवसात सर्व दहा संघ आपला पहिला सामना खेळले आहेत.

दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Mar 30, 2022 | 4:55 PM

मुंबई: बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेची (IPL) जोरदार सुरुवात झाली आहे. 26 मार्च ते 29 मार्च म्हणजे शनिवार ते मंगळवार या चार दिवसात सर्व दहा संघ आपला पहिला सामना खेळले आहेत. काही उत्कंठावर्धक सामने देखील यावेळी पहायला मिळाले. मंगळवारी पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर (Pune Mca Stadium) राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये (RR vs SRH) सामना झाला. राजस्थानने या लढतीत सनरायजर्सवर 61 धावांनी मोठा विजय मिळवला. सर्व दहा संघांनी आपला पहिला सामना खेळला आहे. त्यामुळे आता पॉइंट्स टेबल बद्दल जाणून घेऊया. राजस्थानने कालच्या सामन्यात धावांच्या मोठ्या फरकाने एकतर्फी विजय मिळवला. संजू सॅमसन राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला. अन्य फलंदाजांनीही त्याला चांगली साथ दिली.

समान गुण असतील, तर पहिलं-दुसरं स्थान कसं ठरवायचं?

पहिल्या टप्प्यात कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स, गुजरात टायन्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी आपले सलामीचे सामने जिंकेल आहेत. सर्वच टीम्सच्या खात्यात दोन पॉइंटस जमा झाले आहेत. सर्वच संघांचे समान गुण असतात, त्यावेळी कुठला संघ कुठल्या स्थानावर रहाणार हे नेट रनरेटच्या आधारावर ठरते. सध्यातरी या शर्यतीत राजस्थान रॉयल्सने पहिलं स्थान मिळवलं आहे. काल आपल्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर राजस्थानने 210 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन सनरायजर्स हैदराबादला 149 धावांवर रोखलं. राजस्थानने स्पर्धेतील एका मोठ्या विजयाची नोंद केली.

राजस्थान टॉपवर, दिल्ली दुसऱ्या स्थानावर

हैदराबादवरील विजयामुळे राजस्थानच्या खात्यात दोन पॉइंटस जमा झाले आहेत. मोठ्या विजयामुळे 3.050 च्या रनरेटसह ते पहिल्या स्थानावर आहेत. दिल्ली, कोलकाता, पंजाब आणि गुजरातपेक्षा राजस्थानचा रनरेट जास्त आहे. दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या स्थानावर आहे. दिल्लीचा NRR 0.914 आहे. दिल्लीने मुंबईला पराभूत केलं होतं. त्यानंतर पंजाब किंग्स तिसऱ्या नंबरवर आहे. त्यांनी RCB विरुद्ध 206 धावांचे मोठे लक्ष्य पार केले होते. 0.697 त्यांचा नेट रनरेट आहे. कोलकाता 0.639 आणि गुजरातचा 0.286 रनरेट आहे.

आयपीएल 2022 पॉइंट टेबलची स्थिती

संघ सामने जय पराजय पॉइंट्स नेट रन रेट
गुजरात टायटन्स

14104200.316
राजस्थान रॉयल्स
1495180.298
लखनौ सुपर जायंट्स1495180.251
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
148616-0.253
दिल्ली कॅपिटल्स 1477140.204
पंजाब किंग्स 1477140.126
कोलकाता नाइट रायडर्स1468120.146
सनरायजर्स हैदराबाद 146812-0.379
चेन्नई सुपर किंग्स 144108-0.203
मुंबई इंडियन्स144108-0.506

 

पराभूत संघांची स्थिती काय?

पराभूत संघांमध्ये लखनौ सुपर जायंट्स सहाव्या स्थानावर आहे. आयपीएलमध्ये डेब्यू करणाऱ्या लखनौच्या टीमचा दुसरी डेब्यु करणारी टीम गुजरात टायटन्सने पराभव केला होता. त्यांचा NRR(-0.286) आहे. चेन्नई सुपर किंग्स (-०.639) सातव्या स्थानावर आहे. (-0.697) सह बँगलोर आठव्या स्थानावर पाचवेळची विजेती मुंबई इंडियन्स (-0.914) नवव्या स्थानावर तर सनराजयर्स हैदराबाद शेवटच्या स्थानावर आहे. त्यांचा रनरेट (-3050) आहे.

संबंधित बातम्या:
Sanju Samson Fifty ipl 2022: संजू, संजू, संजू आज रात्री वॉशिंग्टन सुंदरच्या स्वप्नात सॅमसन येणार नाही ना?
IPL 2022 SRH VS RR: SRH ने आज ‘तिला’ निराश केलं, जाणून घ्या रॉयल विजयाची पाच कारणं
Glenn Phillips not Available ipl 2022: अजूनही SRH चा हा खेळाडू भारतात पोहोचला नाही, कुठे फसलाय ते इन्स्टाग्रामवर सांगितलं

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें