AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 Video : अर्जुन तेंडुलकरच्या तोंडून निघाले कॅमेरामनबाबत अपशब्द? व्हायरल Video मुळे नेटकऱ्यांची चर्चा

IPL 2023 MI vs SRH : सनराईजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात शेवटचं षटक अर्जुन तेंडुलकरने चांगल्या पद्धतीने हाताळलं. तसं पाहिलं 6 चेंडूत 20 धावा करणं आयपीएलमध्ये तरी सोपं आहे. पण अर्जुनने ते शिवधनुष्य पेललं. पण असं असलं तरी अर्जुन एका वेगळाच कारणाने चर्चेत आहे.

IPL 2023 Video : अर्जुन तेंडुलकरच्या तोंडून निघाले कॅमेरामनबाबत अपशब्द? व्हायरल Video मुळे नेटकऱ्यांची चर्चा
अर्जुन तेंडुलकरकडे कॅमेरा दाखवताच अपशब्दांचा भडीमार? व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मीडियावर रंगली चर्चाImage Credit source: BCCI/IPL
| Updated on: Apr 19, 2023 | 1:04 PM
Share

मुंबई : अर्जुन तेंडुलकर हा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा मुलगा असल्याने त्याच्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. असं असलं तरी अर्जुन तेंडुलकरने आपल्या मेहनतीच्या जोरावर क्रिकेटमध्ये पाय रोवत आहे. गेल्या दोन सिझनपासून डगआऊटमध्ये बसलेल्या अर्जुनला यंदा संधी मिळाली. दोन सामन्यात त्याने चांगली गोलंदाजी केली. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात शेवटचं शतक व्यवस्थितरित्या टाकत क्रीडारसिकांची मनं जिंकली. 20 धावा आवश्यक असताना अवघ्या पाच धावा देत मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला. इतकंच काय तर आयपीएलमधील पहिल्या विकेटची नोंदही केली.  इतकी चांगली कामगिरी केल्यानंतरही अर्जुन एका वेगळ्या कारणासाठी सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ मुंबई इंडियन्सच्या फलंदाजी वेळचा आहे. यात अर्जुन तेंडुलकर डगआऊटमध्ये बसलेला दिसत आहे. तेव्हा कॅमेरामन त्याला स्क्रिनवर दाखवतो. यानंतर अर्जुन रागात सहकाऱ्याकडे आपला भावना व्यक्त करताना दिसत आहे. या व्हिडीओतील लिप सिंकवरून सोशल मीडियावर वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत.

एका युजर्सने लिहिलं आहे की, “मी अर्जुनला अपशब्द बोलताना पाहिलं.” तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं की, “जेव्हा कॅमेरा अर्जुनकडे गेला तेव्हा त्याने सांगितलं की हे लोकं मला जाणूनबुजून दाखवतात.”

हैदराबाद विरुद्धचा सामना मुंबई इंडियन्सने 14 धावांनी जिंकला. मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 192 धावा केल्या. हैदराबादचा संघ 19.5 षटकात सर्वबाद 178 धावाच करू शकला.

अर्जुन तेंडुलकर याची पहिली प्रतिक्रिया

“मला आयपीएलमध्ये पहिली विकेट मिळाली. मला ओव्हर टाकण्यासाठी बॉल दिल्यानंतर पूर्ण लक्ष केंद्रित केलं होतं. मला गोलंदाजी आवडते, कॅप्टनने मला बॉलिंग करण्यास सांगितले. तेव्हा मी सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न केला आणि तसंच झालं. सचिन तेंडुलकर आणि मी क्रिकेटबद्दल बोलतो, आम्ही खेळाआधी डावपेचांवर चर्चा करतो. मी फक्त चेंडू टाकण्यावर लक्ष केंद्रित केलं.”, अशी प्रतिक्रिया अर्जुनने सामन्यानंतर दिली.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | एडम मार्करम (कॅप्टन), मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), राहूल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार, मयांक मार्कंडे, मार्को जानसेन, टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, अर्जुन तेंडुलकर, नेहल वढेरा, हृतिक शौकीन, पीयूष चावला आणि जेसन बेहरेनडॉर्फ.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार