MI vs CSK : धोनीच्या 20 धावा रोहितच्या शतकापेक्षा सरस, पलटण वानखेडेत अपयशी, चेन्नईचा विजय

IPL 2024 MI vs CSK Highlights In Marathi : चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 207 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र चेन्नई मुंबईला 186 धावांवर रोखण्यात यशस्वी ठरली.

MI vs CSK : धोनीच्या 20 धावा रोहितच्या शतकापेक्षा सरस, पलटण वानखेडेत अपयशी, चेन्नईचा विजय
m s dhoni and rohit sharma mi vs csk ipl 2024,Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Apr 14, 2024 | 11:49 PM

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 29 व्या सामन्यात 20 धावांनी विजय मिळवला आहे. चेन्नई सुपर किंग्सने मुंबईला विजयसाठी 207 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईकडून ओपनर रोहित शर्मा याने अखेरपर्यंत एकाकी झुंज देत जोरदार लढाई दिली. मात्र दुसऱ्या बाजूने रोहितला साथ न मिळाल्याने चेन्नईने मुंबईवर 20 धावांनी विजय मिळवला. एकटा महेंद्रसिंह धोनी मुंबईच्या पराभवाचा कारण ठरला. धोनीने चेन्नईच्या डावातील 20 व्या ओव्हरमधील शेवटच्या 4 बॉलमध्ये 20 धावा ठोकल्या. मुंबईसाठी याच 20 धावा पराभवासाठी कारणीभूत ठरल्या. मुंबईला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 186 धावाच करता आल्या.

मुंबईकडून रोहित शर्मा याने 63 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 11 चौकारांसह नाबाद 105 धावांची खेळी केली. तिलक वर्मा याने 31 धावा केल्या. ईशान किशन याने 23 आणि टीम डेव्हिड याने 13 धावांचं योगदान दिलं. सूर्यकुमार यादव झिरोवर आऊट झाला. तर इतरांनी घोर निराशा केली. रोहितला शतकानंतरही दुसऱ्या बाजूने साथ न मिळाल्याने मुंबईला पराभूत व्हावं लागलं. चेन्नईकडून मथीशा पथीराणा याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर तुषार देशपांडे आणि मुस्तफिजुर रहमान या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

चेन्नईची बॅटिंग

त्याआधी मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्याने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. शिवम दुबे आणि कॅप्टन ऋतुज गायकवाड या दोघांनी तोडफोड अर्धशतकी खेळी केली. तर महेंद्रसिंह धोनी याने 20 ओव्हरमधील अखरेच्या 4 बॉलमध्ये 3 सिक्ससह 20 धावा केल्या. त्यामुळे चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 206 धावा करता आल्या. चेन्नईकडून ऋतुराजने 40 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 5 फोरसह 69 रन्स केल्या. शिवम दुबे 38 चेंडूत 2 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 66 धावा करुन परतला.रचीन रवींद्र याने 21, महेंद्रसिंह धोनी 20* आणि डॅरेल मिचेल याने 17 धावा केल्या. तर अजिंक्य रहाणे 5 धावावंर बाद झाला. मुंबईकडून हार्दिक पंड्या याने 2 विकेट्स घेतल्या. तर गेराल्ड कोएत्झी आणि श्रेयस गोपाळ या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

चेन्नईचा चौथा विजय

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह आणि आकाश मधवाल.

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे आणि मुस्तफिजुर रहमान.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.