RCB vs GT : आरसीबीसमोर 148 धावांचं आव्हान, गुजरात बचाव करणार?

Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans 1st Innings Highlights In Marathi : आरसीबीच्या गोलंदाजांसमोर गुजरातच्या एका फलंदाजालाही मोठी खेळी करता आली नाही.

RCB vs GT : आरसीबीसमोर 148 धावांचं आव्हान, गुजरात बचाव करणार?
rcb vs gt,Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 10:00 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 52 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला विजयासाठी 148 धावांचं आव्हान दिलं आहे. आरसीबीने गुजरातला ऑलआऊट केलं. गुजरातने 19.3 ओव्हरमध्ये 147 धावा केल्या. आरसीबीच्या अप्रतिम बॉलिंगसमोर गुजरातच्या फलंदाजांना विशेष काही करता आलं नाही. आरसीबीच्या टॉप ऑर्डरमधील तिघांनी घोर निराशा केली. ऋद्धीमान साहा 1, कॅप्टन शुबमन गिल 2 आणि साई सुदर्शन याने 6 धावा केल्या. या तिघांमुळे गुजरातची अडखळत सुरुवात झाली. त्याचाच परिणाम नंतर आलेल्या फलंदाजांवर पाहायला मिळाला.

गुजरातने झटपट 3 विकेट्स गमावल्याने त्यांची 3 बाद 19 अशी स्थिती झाली. त्यानंतर काही फलंदाजांनी मैदानात टिकून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही एकावेळेनंतर खास काही करता आलं नाही. डेव्हिड मिलरने 20 बॉलमध्ये 30 धावा केल्या. राहुल तेवतिया 21 बॉलमध्ये 35 रन्स करुन माघारी परतला. तर शाहरुख खान याने 24 बॉलमध्ये 37 धावांचं योगदान दिलं. राशिद खान याने 18 आणि विजय शंकरने 10 रन्स केल्या. तर मानव सुथार 1 रनवर आऊट झाला. मोहित शर्माला खातंही उघडता आलं नाही. तर नूर अहमद झिरोवर नाबाद परतला.

आरसीबीकडून एकूण 6 जणांनी बॉलिंग केली. त्यापैकी 5 जणांनी विकेट्स घेतल्या. तर 1 अपयशी ठरला. मोहम्मद सिराज आणि यश दयाल आणि विजयकुमार वैशाख या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर कॅमरुन ग्रीन आणि कर्ण शर्मा या दोघांनी 1-1 विकेट घेतली. दरम्यान आरसीबीला हा सामना जिंकून प्लेऑफच्या जर तरच्या आशा कायम ठेवण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला गुजरातसाठी ही सामना निर्णायक आहे. त्यामुळे आता दोघांपैकी कोण बाजी मारतं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

आरसीबीसमोर 148 धावांचं आव्हान

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, स्वप्नील सिंग, मोहम्मद सिराज, यश दयाल आणि विजयकुमार वैशाक.

गुजरात टायटन्स लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), ऋद्धीमान साहा, साई सुधारसन, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, मानव सुथार, नूर अहमद, मोहित शर्मा आणि जोशुआ लिटल.

Non Stop LIVE Update
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.