RCB vs KKR : पाच षटकारांचा हिशेब आज होणार चुकता! रिंकू सिंह आणि यश दयाल आमनेसामने

आयपीएल 2024 स्पर्धेतीली दहावा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. कोलकात्याचा दुसरा, तर बंगळुरुचा हा तिसरा सामना आहे. या सामन्यात रिंकू सिंह आणि यश दयाल आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे क्रीडाप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

RCB vs KKR : पाच षटकारांचा हिशेब आज होणार चुकता! रिंकू सिंह आणि यश दयाल आमनेसामने
RCB vs KKR : पाच षटकारानंतर रिंकू सिंह आणि यश दयाल पुन्हा समोरासमोर, द्वंद्वाबाबत उत्सुकता शिगेला
Follow us
| Updated on: Mar 29, 2024 | 4:12 PM

आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात रिंकू सिंह आणि यश दयाल यांच्या कामगिरीवर लक्ष लागून आहे. मागच्या पर्वात यश दयालला पाच षटकार मारून रिंकू सिंह चर्चेत आला होता. त्यानंतर त्याच्यासाठी भारतीय संघाची दारंही खुली झाली. रिंकू सिंह आपल्या जुन्या संघ म्हणजेच केकेआरसोबत आहे. मात्र गुजरात टायटन्सने यश दयालला रिलीज केल्यानंतर आरसीबीने त्याला आपल्या ताफ्यात घेतलं आहे. त्यामुळे या दोघांचं द्वंद्व पाहण्यासाठी क्रीडाप्रेमी उत्सुक आहेत. रिंकू सिंह पुन्हा एकदा यश दयालवर तुटून पडेल की, यश दयाल त्याचा जुना हिशेब चुकता करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यश दयाल रिंकू सिंहने मारलेले पाच षटकार अजूनही विसरलेला नाही. यंदाच्या पर्वात यश दयाल चांगली गोलंदाजी करत आहे. पंजाब विरुद्धच्या सामन्यात 4 षटाकत 23 धावा देत 1 गडी बाद केला. जिंकल्यानंतर मोहम्मद सिराजने त्याची मुलाखत घेतली.

सिराजने यावेळी त्याला पाच षटकारांबाबत विचारलं. यश दयालने त्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला की, ‘आजही ती गोष्ट मला त्रास देत आहे. सामन्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट पाहून दु:खी झालो होतो.’ याबाबतचा विचार करून आजारी पडल्याचंही त्याने पुढे सांगितलं. गुजरात टायटन्सने यश दयालला रिलीज केल्यानंतर आरसीबीने मिनी लिलावात त्याला 5 कोटी देऊन संघात घेतलं.

दुसरीकडे, पंजाब विरुद्धच्या सामन्यानंतर मुरली कार्तिकच्या वक्तव्याने वादाला तोंड फुटलं होतं. कार्तिकने यशची तुलना कचऱ्याशी केली होती. त्यानंतर क्रीडा चाहत्यांनी कार्तिकवर निशाणा साधला होता.आरसीबी फ्रेंचायसीने यश दयालचा फोटो शेअर करत लिहिलं की, हा खरोखर खजिना आहे. ही प्रत्येक वेळेची गोष्ट आहे.

मागच्या पर्वात गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना पार पडला. केकेआरला शेवटच्या षटकात विजयासाठी 28 धावा आवश्यक होत्या. यश दयाल शेवटचं षटक टाकत होता. उमेश यादवने एक धाव घेत रिंकू सिंहला स्ट्राईक दिली. त्यानंतर रिंकू सिंहने पाच चेंडूत पाच षटकार ठोकले आणि केकेआरला विजय मिळवून दिला.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.