AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 RCB vs MI Live Streaming: बंगळुरु विरुद्ध चेन्नई दुसर्‍यांदा आमनेसामने, यलो आर्मी जिंकणार का?

Royal Challengers Bengaluru vs Chennai Super Kings Live Streaming : बंगळुरुने चेन्नईला 18 व्या हंगामात याआधी झालेल्या सामन्यात चेन्नईला पराभूत केलं होतं. त्यामुळे चेन्नईकडे आता या पराभवाची परतफेड करण्यासह आरसीबीच्या प्लेऑफआधी अडचणी वाढवण्याची दुहेरी संधी आहे.

IPL 2025 RCB vs MI Live Streaming: बंगळुरु विरुद्ध चेन्नई दुसर्‍यांदा आमनेसामने, यलो आर्मी जिंकणार का?
RCB vs CSK IPL 2025Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 02, 2025 | 11:12 PM
Share

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 52 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात लढत होणार आहे. महेंद्रसिंह धोनी चेन्नईचं नेतृत्व करणार आहे. तर रजत पाटीदार याच्याकडे आरसीबीच्या कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. चेन्नई आणि आरसीबी या दोन्ही संघांचा हा या हंगामातील प्रत्येकी 11 वा सामना असणार आहे. तसेच दोन्ही संघ या हंगामात दुसऱ्यांदा आमनेसामने असणार आहेत. याआधी उभयसंघात 28 मार्चला लढत झाली होती. तेव्हा आरसीबीने चेन्नईवर 50 धावांनी मात केली होती. त्यामुळे चेन्नईकडे या सामन्यात या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. चेन्नई बंगळुरुचा हिशोब बरोबर करणार का? याकडे यलो आर्मीच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

आरसीबी विरुद्ध चेन्नई सामना केव्हा?

आरसीबी विरुद्ध चेन्नई सामना शनिवारी 3 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.

आरसीबी विरुद्ध चेन्नई सामना कुठे?

आरसीबी विरुद्ध चेन्नई सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरु येथे होणार आहे.

आरसीबी विरुद्ध चेन्नई सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

आरसीबी विरुद्ध चेन्नई सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

आरसीबी विरुद्ध चेन्नई सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

आरसीबी विरुद्ध चेन्नई सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

आरसीबी विरुद्ध चेन्नई लाईव्ह मॅच मोबाईलवर कुठे पाहता येईल?

आरसीबी विरुद्ध चेन्नई लाईव्ह मॅच मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

पॉइंट्स टेबलमधील स्थिती

दरम्यान आरसीबीने या हंगामात 10 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तर 3 वेळा पराभूत व्हावं लागलं आहे. आरसीबी 14 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे आरसीबीकडे हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये धडक देण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला चेन्नईचं या हंगामातील आव्हान संपुष्टात आलं आहे. चेन्नईला 10 फक्त 2 सामनेच जिंकता आले आहेत. त्यामुळे चेन्नईचा अखेरच्या काही सामन्यांमध्ये विजय मिळवून शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. चेन्नई अशात विजय मिळवून प्लेऑफआधी आरसीबीच्या अडचणी वाढवू शकते. त्यामुळे या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

धोनी कोहलीकडे लक्ष

दरम्यान या सामन्यानिमित्ताने विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी हे अनुभवी आणि दिग्गज खेळाडू पुन्हा आमनेसामने असणार आहेत. दोन्ही खेळाडूंची ही या मोसमात एकमेकांसमोर येण्याची अखेरची वेळ असणार आहे. त्यामुळे या दोघांपैकी कोण सरस ठरणार? हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...