VIDEO: अर्जुन तेंडुलकरला दोन्ही सामन्यात बेंचवर बसण्याची वेळ, अखेर नेटमध्ये ऋषभ पंतवर काढला राग

Arjun Tendulkar: आयपीएल 2026 स्पर्धेत अर्जुन तेंडुलकर लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात आहे. मात्र त्याला अजूनही खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण असलं तर अर्जुन तेंडुलकर एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे.

VIDEO: अर्जुन तेंडुलकरला दोन्ही सामन्यात बेंचवर बसण्याची वेळ, अखेर नेटमध्ये ऋषभ पंतवर काढला राग
VIDEO: अर्जुन तेंडुलकरला दोन्ही सामन्यात बेंचवर बसण्याची वेळ, अखेर नेटमध्ये ऋषभ पंतवर काढला राग
Image Credit source: video grab
| Updated on: Apr 07, 2026 | 4:16 PM

मुंबई इंडियन्सकडून अर्जुन तेंडुलकरला लखनौ सुपर जायंट्सने ट्रेड विंडोतून घेतलं. त्यामुळे अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळेल असं बोललं जात होतं. पण संघात दिग्गज गोलंदाजांचा भरणा असल्याने अर्जुन तेंडुलकरला पहिल्या दोन सामन्यात काही संधी मिळाली नाही. अशा स्थितीत अर्जुन तेंडुलकरला नेट प्रॅक्टिस करत राहण्याशिवाय पर्याय नाही. सरावात त्याची कामगिरी चांगली राहिली तर नक्कीच त्याला लखनौ सुपर जायंट्सकडून खेळण्याची संधी मिळू शकते. हे काही आम्ही ठरवत नाही. तर एका व्हायरल व्हिडीओमुळे अर्जुन तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या व्हिडीओत अर्जुन तेंडुलकर गोलंदाजी करताना प्रभावी मारा करत आहे. गोलंदाजाला खरं तर यॉर्कर टाकणं कठीण काम असतं. कारण यॉर्कर चुकला तर थेट चेंडू सीमेपार पोहोचवण्याची ताकद फलंदाजामध्ये असते. अशा स्थितीत अर्जुन तेंडुलकरने धडाधड यॉर्कर टाकले. त्याचे यॉर्कर खेळताना फलंदाजांना पाय वाचवून खेळावं लागलं.

आयपीएल स्पर्धेत अर्जुन तेंडुलकर कधीही संघात खेळण्याची संधी मिळू शकते. या हेतूने जोरदार सराव करत आहे. पण सरावातही त्याने आपलं कौशल्य दाखवलं. एका पाठोपाठ एक धडाधड यॉर्करची रांग लावली. त्याने एकूण 7 यॉर्कर सलग टाकले. फलंदाज बदलत राहिले पण अर्जुनने यॉर्करचा मारा कायम ठेवला. ऋषभ पंत, तर कधी अब्दुल समद, पण अर्जुनचा यॉर्करचा मारा सुरू होता. त्यामुळे या फलंदाजांना पाय वाचवण्याशिवाय पर्याय नव्हता. अर्जुन तेंडुलकरचे प्रभावी यॉर्कर पाहून सोशल मीडियावर त्याच्या गोलंदाजीचं कौतुक होत आहे. या व्हिडीओनंतर लखनौकडून लवकरच मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अर्जुन तेंडुलकरने आयपीएल स्पर्धेत 2023 मध्ये पदार्पण केलं होतं. या पर्वात त्याला 4 सामने खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने 3 विकेट घेतल्या होत्या. यानंतर 2024 मध्ये एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. मागच्या पर्वात त्याने संपूर्ण स्पर्धा बेंचवर बसून पाहिली. पण या पर्वापूर्वी त्याला ट्रेड विंडोच्या माध्यमातून लखनौ सुपर जायंट्समध्ये जाण्याची संधी मिळाली. सुरूवातीच्या दोन सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. कारण लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात एका पेक्षा एक प्रभावी गोलंदाज आहेत. अशा स्थितीत त्याला संधी मिळते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us