MS Dhoni : इतक्यात कमबॅक अशक्य! CSK चाहत्यांना मोठा झटका, धोनीबाबत मोठी अपडेट समोर

IPL 2026 CSK MS Dhoni Comeback : महेंद्रसिंह धोनीशिवाय चेन्नई सुपर किंग्स आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात सपशेल अपयशी ठरलीय. धोनीला दुखापतीमुळे 3 सामन्यांतून बाहेर रहावं लागलंय. अशात आता धोनीच्या कमबॅकबाबत अपडेट समोर आली आहे.

MS Dhoni : इतक्यात कमबॅक अशक्य! CSK चाहत्यांना मोठा झटका, धोनीबाबत मोठी अपडेट समोर
Mahendra Singh Dhoni CSK IPL
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 08, 2026 | 6:00 PM

चेन्नई सुपर किंग्सचा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात अवघ्या काही मोसमांपूर्वी दबदबा होता. चेन्नई विरुद्ध खेळायचं म्हणजे प्रतिस्पर्धी संघासाठी मोठं आव्हान असायचं. महेंद्रसिंह धोनी याच्या (Chennai Super Kings) टीम विरुद्ध खेळायचं म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला पूर्ण ताकदीने मैदानात उतरायला लागायचं. मात्र गेल्या काही मोसमात चेन्नईची ही दहशत कमी झालीय. चेन्नई 19 व्या मोसमात तिसऱ्या फेरीनंतरही विजय मिळवण्यात अपयशी ठरलीय. चेन्नईने ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात सलग तिन्ही सामने गमावलेत. चेन्नईची महेंद्रसिंह धोनीशिवाय (MS Dhoni) दुर्दशा झालीय. स्टंपमागून मॅच फिरवणारा अनुभवी विकेटकीपर आणि माजी कर्णधार धोनीला दुखापतीमुळे या मोसमात अजून खेळता आलं नाहीय. अशात आता धोनीच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

धोनीला पोटरीच्या स्नायूंना दुखापत झाली. त्यामुळे धोनीला पहिल्या 3 सामन्यांतून बाहेर रहावं लागलं. धोनीचा दुखापतीसह संघर्ष सुरु आहे. धोनीचा या दुखापतीवर मात करुन लवकरात लवकर कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे धोनी केव्हा कमबॅक करणार? याकडे यलो आर्मीच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. अशात आता धोनीच्या दुखापतीबाबत नक्की काय समोर आलंय हे जाणून घेऊयात.

क्रिकबझच्या रिपोर्ट्नुसार, धोनी दुखापतीतून बरा होण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत आहे. धोनी अजूनही खेळण्यासाठी फिट नाही. धोनीने चेन्नईच्या 19 व्या मोसमातील पहिल्या 3 सामन्यांसाठी टीमसह प्रवास केला नाही. धोनी कुटुंबियांसह चेन्नईत आहे. धोनीसोबत फिजिओ आणि मसाजर आहेत. धोनीच्या दुखापतीवर ते लक्ष ठेवून आहेत. धोनीने काही दिवसांआधी नेट्समध्ये बॅटिंगचा सराव केला. मात्र धोनीला कमबॅकसाठी अजूनही काही दिवस लागणार आहेत.

धोनीला कमबॅकसाठी किती वेळ लागणार?

रिपोर्ट्सनुसार, धोनीला कमबॅकसाठी अजून 1 आठवडा लागू शकतो. चेन्नई 19 व्या मोसमातील आपला चौथा सामना हा 11 एप्रिलला खेळणार आहे. चेन्नईसमोर घरच्या मैदानात अर्थात एमए चिदंबरम स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिट्ल्सचं आव्हान असणार आहे. त्यामुळे धोनी सलग चौथ्या सामन्यातही खेळणार नसल्याचं स्पष्ट आहे. इतकंच नाही तर धोनीची 14 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होणाऱ्या सामन्यातही खेळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे चाहत्यांना प्रतिक्षा करावी लागणार असल्याचं स्पष्ट आहे.

सीएसकेच्या अडचणीत वाढ

रिपोर्ट्सनुसार, महेंद्रसिंह धोनी याला आणखी काही सामन्यांना मुकावं लागणार आहे.त्यात सीएसकेचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हीस यालाही दुखापतीमुळे धोनीप्रमाणे पहिल्या 3 सामन्यांत खेळता आलेलं नाही. त्यामुळे ऋतुराज आगामी सामन्यात चेन्नईला विजयी ट्रॅकवर परतवण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us