IPL 2026, CSK vs PBKS: संजू सॅमसन फेल, चेन्नई सुपर किंग्सचा डाव पुन्हा एकदा फसला

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सचा डाव पुन्हा एकदा फसला आहे. संजू सॅमसन पुन्हा एकदा फेल गेला. त्यामुळे पावर प्लेच्या आक्रमक धावगतीला ब्रेक लागला. पावरप्लेच्या 6 षटकात 1 गडी गमवून 57 धावा आल्या.

IPL 2026, CSK vs PBKS: संजू सॅमसन फेल, चेन्नई सुपर किंग्सचा डाव पुन्हा एकदा फसला
IPL 2026, CSK vs PBKS: संजू सॅमसन फेल, चेन्नई सुपर किंग्सचा डाव पुन्हा एकदा फसला
Image Credit source: Chennai Super Kings Facebook
| Updated on: Apr 03, 2026 | 9:17 PM

आयपीएल 2026 स्पर्धेच्या सातव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स हे दोन संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा पंजाब किंग्सच्या बाजूने लागला. कर्णधार श्रेयस अय्यरने कौल जिंकताच प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन ही जोडी मैदानात उतरली. मागच्या सामन्यात ही जोडी फेल गेली होती. त्यामुळे या सामन्यात प्रचंड अपेक्षा होत्या. खासकरून संजू सॅमसन या सामन्यात काही तरी खास करेल असं वाटत होतं. पण क्रीडाप्रेमींचा भ्रमनिरास झाला. संजू सॅमसन सलग दुसऱ्या सामन्यात फेल गेला. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सला अपेक्षित सुरूवात मिळाली नाही.

संजू सॅमसनचा खेळ

पंजाब किंग्सकडून पहिलं षटक टाकण्यासाठी अर्शदीप सिंग आला होता. समोर संजू सॅमसन होता आणि त्याने या षटकात चार चेंडूंचा सामना केला. यात त्याने 3 धावा काडल्या. दुसरं षटक टाकण्यासाठी झेव्हियर बार्टलेट आला होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्याला स्ट्राईक मिळाली. हा चेंडू निर्धाव गेला. पण पाचव्या चेंडूवर त्याने चौकार मारला. पण सहाव्या चेंडूवर नको तेच झालं. या चेंडूवर फटका मारता चुकला आणि झेल प्रभसिमरन सिंगच्या हाती झेल गेला. त्याने जराही चूक न करता हा झेल पकडला. त्यामुळे संजू सॅमसनचा डाव अवघ्या 7 धावांवर आटोपला.सलग दुसरा सामना असून सॅमसनला दुहेरी आकडा गाठता आला नाही. याआधीच्या सामन्यात संजूने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 6 धावा केल्या होत्या.

राजस्थान रॉयल्सकडून चेन्नई सुपर किंग्सने संजू सॅमसनला ट्रेड विंडोच्या माध्यमातून घेतलं आहे. रवींद्र जडेजाच्या बदल्यात त्याला संघात घेतलं. पण संजू सॅमसन चाहत्यांचा अपेक्षा अद्यापही पूर्ण करू शकलेला नाही.असं असताना आयुष म्हात्रेने डाव सावरला. त्याच्या खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्सने 6 षटकात1 गडी गमवून 57 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्सने 9.50 च्या रनरेटने धावा केल्या. जर संजू सॅमसन मैदानात असता तर कदाचित हा रनरेट अधिक असता.

Follow Us