CSK vs PBKS : पहिल्याच पराभवानंतर सीएसकेत बदल फिक्स! Playing 11 मधून कुणाचा पत्ता कट?

Chennai Super Kings vs Punjab Kings Probable Playing 11 : चेन्नई सुपर किंग्स ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात शुक्रवारी दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

CSK vs PBKS : पहिल्याच पराभवानंतर सीएसकेत बदल फिक्स! Playing 11 मधून कुणाचा पत्ता कट?
Chennai Super Kings
Image Credit source: PTI
Sanjay patil | Updated on: Apr 03, 2026 | 7:18 AM

चेन्नई सुपर किंग्स आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने करण्यात अपयशी ठरली. सीएसकेला पहिल्याच सामन्यात पहिल्या मोसमातील उपविजेता राजस्थान रॉयल्सकडून 8 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर आता चेन्नई आपल्या मोहिमेतील दुसरा सामना हा 3 एप्रिलला पंजाब किंग्स विरुद्ध खेळणार आहे. हा सामना चेन्नईचं होम ग्राउंड असलेल्या एमए चिंदबरम स्टेडियममध्ये होणार आहे.  सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. चेन्नई पहिल्या पराभवानंतर पंजाब विरूद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. या निमित्ताने चेन्नईची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असू शकते? याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

चेन्नई आधीच त्यांचा प्रमुख आणि सर्वात अनुभवी खेळाडू महेंद्रसिंह धोनी याच्या शिवाय खेळत आहे. त्यात सीएसके विजयी सलामी देण्यात अपयशी ठरली. अशात टीम मॅनेजमेंट पंजाब विरूद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल करु शकते.

Loading...

डेवाल्ड ब्रेव्हीसचा समावेश!

बेबी एबी अर्थात डेवाल्ड ब्रेव्हीस याला सलामीच्या सामन्याला दुखापतीमुळे मुकावं लागलं होतं. त्यामुळे डेवाल्डच्या जागी मॅथ्यू शॉर्ट याचा समावेश करण्यात आला होता. मात्र डेवाल्डला या संधीचा फायदा घेता आला नाही. डेवाल्डने निराशा केली. त्यामुळे डेवाल्डला डच्चू निश्चित समजला जात आहे.

आयुष म्हात्रे याला डच्चू मिळणार?

आयुष म्हात्रे याच्या जागी ऑलराउंडर प्रशांत वीर याचा समावेश केला जाणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. प्रशांतला गेल्या सामन्यात संधी मिळाली नव्हती. मात्र प्रशांतसाठी टीम मॅनेजमेंट आयुषला हात लावेल याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे आता प्रशांतसाठी कुणाला बलिदान द्यावा लागणार? हे टॉसनंतर स्पष्ट होईल.

संजू सॅमसन-ऋतुराज  गायकवाड याच्यावर अधिक जबाबदारी

दरम्यान संजू सॅमसन आणि कॅप्टन ऋतुराज गायकवाड ही सलामी जोडी अनुभवी आहे. मात्र दोघांना सलमीच्या सामन्यात काही विशेष असं करता आलं नाही. दोघेही प्रत्येकी 6-6 धावा करुन बाद झाले. त्यामुळे या दोघांकडून यलो आर्मीला मोठ्या आणि विस्फोटक भागीदारीची आशा असणार आहे.

पंजाब किंग्स विरूद्धच्या सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्सची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), सर्फराज खान, डेवाल्ड ब्रेव्हीस, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, जेमी ओवरटन, अंशुल कंबोज, मॅट हेन्री आणि नूर अहमद.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us