IPL 2026: भावाच्या संघाला सरफराज खानने वडिलासमोर धुतला, 12 चेंडूत 266 च्या स्ट्राईकने धावा

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात चेन्नईची सुरूवात काही चांगली झाली नाही. पण त्यानंतर डाव सावरला. आयुष म्हात्रे आणि सरफराजची खेळी महत्त्वाची ठरली.

IPL 2026: भावाच्या संघाला सरफराज खानने वडिलासमोर धुतला, 12 चेंडूत 266 च्या स्ट्राईकने धावा
IPL 2026: भावाच्या संघाला सरफराज खानने वडिलासमोर धुतला, 12 चेंडूत 266 च्या स्ट्राईकने धावा
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 03, 2026 | 10:37 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नईच्या होमग्राउंडवर पंजाब किंग्स आणि सीएसके संघ आमनेसामने आला आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा पंजाब किंग्सच्या बाजूने लागला. पंजाबने प्रथम गोलंदाजी निवडली आणि चेन्नईला फलंदाजीसाठी बोलावलं. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची सुरूवात काही चांगली झाली नाही. संजू सॅमसन झटपट बाद झाला त्यामुळे संघावर दडपण वाढलं. पण आयुष म्हात्रेच्या खेळीने डाव सावरला. इतकंच काय मधल्या फळीत सरफराज खानची खेळी महत्त्वपूर्ण ठरली. सरफराज खानने या सामन्यात छोटी पण आक्रमक खेळी केली. सरफराज खानने 12 चेंडूत 32 धावांची खेळी केली. त्याच्या आक्रमक खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्सला 200 पार धावा करण्यास मदत झाली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 266.66 चा होता.

चेन्नई सुपर किंग्सची चौथी विकेट 130 धावांवर पडली. कार्तिक शर्मा अवघी 1 धाव करून बाद झाला. त्यामुळे 14व्या षटकात फलंदाजीची संधी सरफराज खानला मिळाली. या संधीचा त्याने पुरेपूर फायदा उचलला. मार्को यानसेनच्या दोन चेंडू निर्धाव घालवले. त्यानंतर पुढच्या षटकात त्याचा सामना अर्शदीपशी झाला. या षटकात त्याने अर्शदीपला सलग तीन चौकार मारले. तसेच एक धाव काढली. झेव्हियर बार्टलेट नंतर समोर आला. त्याला एक षटकार आणि एक धाव काढली. विजयकुमार विशाक समोर आला. त्यालाही सलग तीन चौकार मारले. पण चौथ्या चेंडूवर बाद झाला. या 12 चेंडूत 32 धावा काढत त्याने आपलं काम बजावून गेला.

वडिलांसमोर छोट्या भावाच्या संघाची धुलाई

सरफराज खानने आपल्या वडिलांसमोर आक्रमक खेळी केली. हा सामना पाहण्यासाठी सरफराजचे वडील मैदानात उपस्थित होते. दुसरं म्हणजे, सरफराजसमोर छोट्या भावाची टीम होती. सरफराज खानचा छोटा भाऊ मुशीर खान हा पंजाब किंग्सचा भाग आहे. पण त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नाही. दुसरीकडे, सरफराज खानने मिळालेल्या संधीचं 12 चेंडूत सोनं केलं. आयपीएल स्पर्धेत गेल्या काही वर्षात सरफराजला कोणी भाव दिला नव्हता. पण मिनी लिलावात चेन्नई सुपर किंग्सने त्याच्यावर डाव लावला आणि संघात घेतलं.

Follow Us