CSK vs PBKS: चेन्नईसाठी मुंबई ‘लोकल’ची फटकेबाजी, पंजाबसमोर 210 रन्सचं टार्गेट, कोण जिंकणार?

Chennai Super Kings vs Punjab Kings : मुंबईच्या फलंदाजांनी चेन्नई सुपर किंग्ससाठी सर्वाधिक धावा जोडल्या. त्यामुळे यलो आर्मीला पंजाब किंग्स विरुद्ध धावांचं अर्धशतक पूर्ण करता आलं.

CSK vs PBKS: चेन्नईसाठी मुंबई लोकलची फटकेबाजी, पंजाबसमोर 210 रन्सचं टार्गेट, कोण जिंकणार?
Ayush Mhatre Shivam Dube and Sarfaraz Khan
Image Credit source: IPL X Account
Sanjay patil | Updated on: Apr 03, 2026 | 10:20 PM

चेन्नई सुपर किंग्सने घरच्या मैदानात खेळताना आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) सातव्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध 200 पार मजल मारली आहे. सीएसकेने पंजाबसमोर 210 धावांचं आव्हान ठेवलं आहे. सीएसकेने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 209 धावा केल्या. चेन्नईसाठी एकूण 4 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी खेळणाऱ्या 3 ‘खडूस’ फलंदाजांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. यलो आर्मीसाठी युवा आयुष म्हात्रे याने सर्वाधिक धावा केल्या. सर्फराज खान याने फायर खेळी साकारली. ऑलराउंडर शिवम दुबे याने नाबाद राहत फिनिशिंग टच दिला. तर कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने सन्मानजनक धावा केल्या.

चेन्नईची बॅटिंग

पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड ही चेन्नईची सलामी जोडी पुन्हा एकदा अपयशी ठरली. संजू स्वस्तात आऊट झाला. संजूने 7 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.

Loading...

दुसऱ्या विकेटसाठी निर्णायक भागीदारी

संजूनंतर ऋतुराजला साथ देण्यासाठी आयुष म्हात्रे मैदानात आला. ऋतुराज आणि आयुष या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे चेन्नईला 200 पार मजल मारता आली. या भागीदारीदरम्यान आयुषने कारकीर्दीतील दुसरं आणि 19 व्या हंगामातील पहिलं अर्धशतक झळकावलं. दोन्ही बाजूने फटकेबाजी सुरु होती. तर पंजाब विकेटच्या शोधात होती. आयुष आणि ऋतुराजला शतकी भागीदारी करण्याची संधी होती. मात्र त्याआधी ही जोडी फुटली. ऋतुराज 28 धावा करुन बाद झाला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 96 रन्सची पार्टनरशीप केली.

ऋतुराजनंतर आयुष आऊट

ऋतुराजनंतर पुढच्याच ओव्हरमध्ये आयुष आऊट झाला. आयुषने 43 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 6 फोरसह सर्वाधिक 73 रन्स केल्या. कार्तिक शर्मा 1 रन करुन आऊट झाला. त्यानंतर सर्फराज आणि शिवम या दोघांनी पंजाबच्या गोलंदाजांना धुतला. दोघांनी फक्त पाचव्या विकेटसाठी 18 बॉलमध्ये 38 रन्स जोडल्या. सर्फराज खान याने 266.67 च्या स्ट्राईक रेटने 12 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 32 रन्स केल्या.

लाईव्ह स्कोअरकार्ड

शिवमकडून फिनिशिंग टच

सहाव्या विकेटसाठी प्रशांत वीर आणि शुबम दुबे या दोघांनी 20 चेंडूत नाबाद 41 धावांची भागादारी केली. प्रशांतने 6 रन्स केल्या. तर शिवमने 1 सिक्स आणि 5 फोरसह नॉट आऊट 45 रन्स केल्या. पंजाबसाठी विजयकुमार वैशाख याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us