KKR vs MI : मुंबईचा अचूक हिशोब, केकेआरचा 4 विकेट्सने विजय, प्लेऑफची किती संधी?

Kolkata Knight Riders vs Mumbai Indians Match Result and Highlights, IPL 2026 : मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्ससमोर विजयासाठी 148 धावांचं आव्हान ठेवलं होतं. केकेआरने हे आव्हान सहज पूर्ण केलं. केकेआरने यासह प्लेऑफमधील आपली शक्यता कायम ठेवली आहे.

KKR vs MI : मुंबईचा अचूक हिशोब, केकेआरचा 4 विकेट्सने विजय, प्लेऑफची किती संधी?
Manish Pandey and Rovman Powell KKR vs MI
Image Credit source: IPL X Account
| Updated on: May 21, 2026 | 1:36 AM

रोव्हमॅन पॉवेल आणि मनीष पांडे या जोडीने केलेल्या निर्णायक खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 65 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. मुंबईने केकेआरसमोर कोलकातामधील ऐतिहासिक इडन गार्डन्समध्ये 148 धावांचं आव्हान ठेवलं होतं. केकेआरने हे आव्हान 7 बॉलआधी आणि 4 विकेट्स राखून पूर्ण केलं. केकेआरने 18.5 ओवरमध्ये 6 विकेट्सच्या मोबदल्यात विजयी धावा केल्या. केकेआरने यासह 2 गुणांची कमाई केली. केकेआरचा हा 19 व्या मोसमातील 13 सामन्यांमधील सहावा विजय ठरला. केकेआरचा हा गेल्या 7 सामन्यांमधील सहावा विजय ठरला. तसेच केकेआरने घरच्या मैदानात विजयी हॅट्रिक पूर्ण केली. तर मुंबईचा नववा पराभव ठरला. मुंबई लखनौ सुपर जायंट्सनंतर 19 व्या मोसमात 9 सामने गमावणारी दुसरी टीम ठरली.

सामन्यात काय झालं?

केकेआरने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. केकेआरच्या गोलंदाजांनी कर्णधार अजिंक्य रहाणे याचा निर्णय योग्य ठरवला. केकेआरच्या गोलंदाजांसमोर मुंबईला 150 पारही पोहचता आलं नाही. नमन धीर याला भोपळा फोडता आला नाही. तर रायन रिकेल्टन याने 6 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरल. या व्यतिक्त इतर सर्वांना अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र एकालाही काही खास करता आलं नाही. मात्र अखेरच्या क्षणी कॉर्बिन बॉश याने मुंबईची लाज राखली.

कॉर्बिनची निर्णायक खेळी

कॉर्बिनने मुंबईसाठी शेवटच्या क्षणी 18 बॉलमध्ये नॉट आऊट 32 रन्स केल्या. त्यामुळे मुंबईला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 147 धावांपर्यंत पोहचता आलं. केकेआरसाठी सौरभ दुबे, कॅमरुन ग्रीन आणि कार्तिक त्यागी या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर सुनील नारायण याने 1 विकेट मिळवली.

केकेआरची बॅटिंग

केकेआरने हा सामना जिंकला. मात्र केकेआरला संघर्ष करावा लागला. फिन एलन याने 8 धावा जोडल्या. केकेआरसाठी कॅप्टन अजिंक्य रहाणे याने 21 धावा केल्या. तर तर कॅमरुन ग्रीन 4 धावा करुन बाद झाला. त्यामुळे केकेआरची 3 आऊट 54 अशी स्थिती झाली. मात्र रोव्हमॅन पॉवेल आणि मनीष पांडे या अनुभवी जोडीने निर्णायक भागीदारी केली. रोव्हमॅन आणि मनीष या दोघांनी 47 बॉलमध्ये 64 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर मनीष पांडे आऊट झाला. मनीषने केकेआरसाठी सर्वाधिक धावा केल्या. मनीषने 33 चेंडूत 6 चौकारांसह 45 धावा केल्या.

स्कोअरकार्ड


मनीषनंतर रोव्हमॅन आऊट झाला. रोव्हमॅनने 30 बॉलमध्ये 40 रन्स केल्या. तेजस्वी दहीया 11 धावांवर बाद झाला. तर अनुकूल रॉय आणि रिंकु सिंह या जोडीने उर्वरित धावा करुन केकेआरला विजयी केलं. रिंकूने नाबाद 9 धावा केल्या. तर अनुकूल रॉय याने नॉट आऊट 4 रन्स केल्या. मुंबईसाठी कॉर्बिन बॉश याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. दीपक चाहर,जसप्रीत बुमराह आणि अल्लाह गजनफर या त्रिकुटाने प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us