KKR vs MI : कॉर्बिन बॉशचा फिनिशिंग टच, मुंबईच्या 147 धावा, केकेआर निर्णायक सामन्यात जिंकणार?
Kolkata Knight Riders vs Mumbai Indians 1st Innings Highlights : कॉर्बिन बॉश याने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सला 150 धावांजवळ पोहचता आलं. आता मुंबई केकेआरसमोर या धावांचा यशस्वी बचाव करणार का? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2026 स्पर्धेतील (IPL 2026) 65 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्ससमोर 148 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबईने कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये 20 षटकांत 8 विकेट्स गमावून 147 धावा केल्या. मुंबईच्या रायन रिकेल्टन आणि नमन धीर या दोघांचा अपवाद वगळता इतर सर्वांनी दुहेरी आकड्यात धावा केल्या. मात्र त्यापैकी एकालाही मुंबईसाठी मोठी खेळी करता आली नाही. अखेरच्या क्षणी कॉर्बिन बॉश याने क्षणी गेम फिरवला. कॉर्बिन बॉश याने जवळपास 200 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्यामुळे मुंबईला केकेआरसमोर सन्मानजनक आव्हान ठेवता आलं. मुंबईचं या मोसमातील आव्हान संपुष्ठात आलं आहे. तर केकेआरसाठी प्लेऑफमधील आव्हान कायम राखण्यासाठी हा सामना जिंकणं बंधनकारक आहे. त्यामुळे केकेआर या धावा करुन सामना जिंकणार की मुंबई मैदान मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबईची पावरप्लेमध्ये पडझड
टी 20 क्रिकेटमध्ये पावरप्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये फटकेबाजी करुन मोठ्या धावसंख्येचा पाया रचण्याची संधी असते. मात्र मुंबई या संधीचं सोनं करण्यात अपयशी ठरली. केकेआरने मुंबईला पावरप्लेमध्ये 4 आणि मोठे झटके दिले. रायन रिकेल्टन आणि नमन धीर या दोघांनी निराशा केली. रायनने 6 धावा केल्या. तर नमनला भोपळाही फोडता आला नाही. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोघांना ठिकठाक सुरुवात मिळाली. मात्र दोघेही अपयशी ठरले. दोघेही प्रत्येकी 15-15 धावा करुन माघारी परतले.
तिलक-हार्दिकची संथ खेळी
तिलक वर्मा आणि कॅप्टन हार्दिक पंड्या या दोघांनी काही वेळ मैदानात घालवला. त्यामुळे या दोघांकडून मोठ्या भागीदारीची संधी होती. मात्र दोघांनी संथ खेळी करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तिलकने 32 बॉलमध्ये 20 रन्स केल्या. तर हार्दिक 27 बॉलमध्ये 26 रन्स करुन आऊट झाला. विल जॅक्स याने 14 धावा जोडल्या.
कॉर्बिन बॉशचा तडाखा
अखेरच्या क्षणी कॉर्बिन बॉश याने फटकेबाजी करुन मुंबईला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवण्यात प्रमुख योगदान दिलं. कॉर्बिनने 18 बॉलमध्ये 32 रन्स केल्या. कॉर्बिनने या दरम्यान 2 सिक्स आणि 3 फोर लगावले. तर दीपक चाहर याने 7 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 10 धावा केल्या.
स्कोअरकार्ड
केकेआरची चिवट बॉलिंग
केकआरसाठी एकूण 6 जणांनी बॉलिंग केलीय. त्यापैकी एकानेही 10 च्या इकॉनमीने धावा दिल्या नाहीत. केकेआरसाठी सौरभ दुबे, कॅमरुन ग्रीन आणि कार्तिक त्यागी या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर सुनील नारायण याने 1 विकेट मिळवली.