IPL 2026 : रिंकु सिंहची कडक कामगिरी, आंद्रे रसेलचा रेकॉर्ड ब्रेक, हैदराबाद विरुद्ध धमाका

KKR vs SRH Rinku Singh IPL 2026 : केकेआरचा बेस्ट फिनिशिर आणि उपकर्णधार रिंकु सिंह याने 2 एप्रिलला कमाल केली. रिंकुने दोघांची कॅच घेत मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

IPL 2026 : रिंकु सिंहची कडक कामगिरी, आंद्रे रसेलचा रेकॉर्ड ब्रेक, हैदराबाद विरुद्ध धमाका
Rinku Singh KKR IPL 2026
Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 04, 2026 | 9:54 AM

अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलच्या 19 व्या हंगामात गुरुवारी 2 एप्रिलला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. इशान किशन याच्या नेतृत्वात सनरायजर्स हैदराबादने केकेआरला त्यांच्याच घरच्या मैदानात इडन गार्डन्समध्ये 65 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केलं. सनरायजर्स हैदराबादने केकेआर विरुद्ध विस्फोटक बॅटिंग करत 226 धावा केल्या होत्या. केकेआरला विजयी धावांचा पाठलाग करताना पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. हैदराबादने केकेआरला 24 बॉलआधी ऑलआऊट केलं. केकेआरचा डाव 16 ओव्हरमध्ये 161 रन्सवर आटोपला. केकेआर यासह 19 व्या मोसमात सलग 2 सामने गमावणारी पहिलीच टीम ठरली.

केकेआर विजयी होण्यात अपयशी ठरली. मात्र केकेआरच्या 2 खेळाडूंनी या सामन्यात खास कामगिरी केली. अंगकृष रघुवंशी याने सलग दुसरं अर्धशतक ठोकत ऑरेंज कॅप मिळवली. तर उपकर्णधार रिंकु सिंह यानेही कमाल केली. रिंकुने हैदराबादच्या 2 फलंदाजांच्या झेल घेतल्या. रिंकूने इशान किशन आणि अनिकेत वर्मा या दोघांच्या कॅच घेतल्या. रिंकुने यासह मोठा विक्रम आपल्या नावावर केला. रिंकु केकेआरसाठी सर्वाधिक कॅच घेणार पहिला खेळाडू ठरला. रिंकुने याबाबतीत माजी ऑलराउंडर आंद्रे रसेल याला मागे टाकलं.

केकेआरसाठी सर्वाधिक कॅच घेणारे खेळाडू

रिंकू सिंह : 41 झेल

आंद्रे रसेल : 40 झेल

सुनील नारायण : 36 झेल

मनोज तिवारी : 30 झेल

रिंकूने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत केकेआरसाठी 41 कॅचेस घेतल्या आहेत. रिंकूची उंची कमी आहे. मात्र त्याला त्याची उंची कमी असणं याचा कॅच घेताना कुठेच त्रास होत नाही. रिंकु क्रिकेट विश्वातील फिनिशिर आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. रिंकूमुळे आंद्रे रसेल याची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. रसेलने आयपीएल कारकीर्दीत केकेआरसाठी 40 कॅचेस घेतल्या होत्या.

तर केकेआरसाठी सर्वाधिक कॅचेस घेणाऱ्या सक्रीय खेळाडूंच्या यादीत सुनील नारायण दुसऱ्या तर एकूण तिसऱ्या स्थानी आहे. सुनीलने एकूण 36 कॅच घेतल्या आहेत. तर माजी खेळाडू मनोज तिवारी 30 कॅचसह चौथ्या स्थानी कायम आहे.

केकेआरचा पुढील सामना केव्हा?

दरम्यान केकेआरचा या मोहिमेतील तिसरा सामना हा सोमवारी 6 एप्रिलला होणार आहे. केकेआरसमोर या सामन्यात विजय मिळवून पराभवाची हॅट्रिक टाळण्याचं आव्हान असणार आहे. तर पंजाब केकेआरला पराभूत करुन सलग आणि एकूण तिसरा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

Follow Us