IPL 2026, LSG vs SRH: लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने, असा आहे रेकॉर्ड

आयपीएल 2026 स्पर्धेतील दहाव्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. आतापर्यंत या दोन्ही संघांची हेड टू हेड कामगिरी काय ते जाणून घेऊयात.

IPL 2026, LSG vs SRH: लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने, असा आहे रेकॉर्ड
IPL 2026, LSG vs SRH: लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने, असा आहे रेकॉर्ड
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 04, 2026 | 4:08 PM

आयपीएल 2026 स्पर्धा आता तिसऱ्या टप्प्यात पदार्पण करणार आहे. या स्पर्धेतील दहाव्या सामन्यातक लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने येणार आहेत. लखनौ सुपर जायंट्सचा या स्पर्धेतील दुसरा सामना आहे. तर सनरायझर्स हैदराबाद या स्पर्धेतील तिसरा सामना असणार आहे. सनरायझर्स हैदराबादचा पहिला सामना आरसीबीविरूद्ध झाला होता. या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. पण दुसऱ्या सामन्यात कमबॅक केलं आणि केकेआरला पराभवाची धूळ चारली. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सची या स्पर्धेतील सुरूवात काही चांगली झाली नाही. पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात विजयी ट्रॅकवर परतण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे.

दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएल स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ 6 वेळा आमनेसामने आले आहेत. यात लखनौ सुपर जायंट्सचं पारडं जड दिसत आहे. लखनौ सुपर जायंट्सने 4 सामन्यात, तर सनरायझर्स हैदराबादने 2 सामन्यात विजय मिळवला आहे. लखनौचा हैदराबादविरुद्ध सर्वाधिक धावसंख्या ही 205 आहे, तर सनरायझर्स हैदराबादची 206 इतकी आहे. तर सर्वात कमी धावसंख्येबाबत बोलायचं तर लखनौने हैदराबादविरुद्ध 127, तर सनरायझर्स हैदराबादने 121 धावा केल्या आहेत. मागच्या पर्वात हैदराबाद आणि लखनौ यांच्यात दोनदा सामना झाला होता. यात दोन्ही संघांनी प्रत्येकी एक विजय नोंदवला होता. हैदराबादमध्ये सामना जिंकायचा असेल दोन्ही संघ आपल्या आक्रमक फलंदाजीवर अवलंबून असतील. या सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी करणारा संघ विजयाची चव चाखेल, असं क्रीडाप्रेमी म्हणत आहेत.

नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने?

आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यात नाणेफेकीचा कौल हा सनरायझर्स हैदराबादच्या बाजूने सर्वाधिक वेळा लागला आहे. सनरायझर्स हैदराबादने 6 पैकी 4 सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. तर लखनौ सुपर जायंट्सने फक्त 2 सामन्यात नाणेफेक जिंकली आहे. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकल्यानंतर एकदा फलंदाजी आणि एकदा गोलंदाजी स्वीकारली होती. तर लखनौने नाणेफेक जिंकल्यानंतर दोनदा फलंदाजी आणि दोनदा गोलंदाजी स्वीकारली होती. विशेष म्हणजे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर दोन्ही संघ प्रत्येकी 1 सामना जिंकले आहेत.

Follow Us