IPL 2026 Points Table : केकेआर विरुद्ध पंजाब सामना पावसामुळे रद्द, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी कोण?
IPL 2026 Points Table : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 12 वा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.

Punjab Kings IPL 2026
Image Credit source: Bcci
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 12 वा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या 12 व्या सामन्यात यजमान कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स आमेनसामने होते. सामना रद्द करण्यात आल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला. या 1 गुणामुळे सलग 2 सामने गमावणाऱ्या केकेआरचं खातं उघडलं. हा सामना रद्द झाल्याने केकेआरला आपल्या पहिल्या विजयासाठी मॅचची प्रतिक्षा करावी लागणार आहे. तर सलग 2 सामने जिंकणाऱ्या पंजाबची केकेआर विरुद्धचा सामना रद्द झाल्याने विजयी हॅट्रिक मिळवण्याची संधी हुकली. आता या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलचं काय चित्र आहे? हे आपण जाणून घेऊयात.
Follow Us