AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs MI : राजस्थान सलग तिसऱ्या विजयसाठी सज्ज, मुंबई यजमानांना रोखणार?

Mumbai Indians vs Rajasthan Royals : मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात मंगळवारी होणारा हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील 32 वा सामना असणार आहे. राजस्थानला हा सामना जिंकून विजयी हॅट्रिक करण्याची संधी आहे.

RR vs MI : राजस्थान सलग तिसऱ्या विजयसाठी सज्ज, मुंबई यजमानांना रोखणार?
IPL 2026 Mumbai IndiansImage Credit source: Bcci
| Updated on: Apr 07, 2026 | 3:43 PM
Share

मुंबई इंडियन्ससमोर आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 13 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचं आव्हान असणर आहे. हा सामना गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. दोन्ही संघांचा हा तिसरा सामना असणार आहे. रियान पराग याच्याकडे राजस्थान रॉयल्सच्या नेतृत्वाची जबाबदारी असणार आहे. तर हार्दिक पंड्या याचं कमबॅक होणार असल्याचं निश्चित आहे. त्यामुळे हार्दिक पुन्हा एकदा 1 सामन्यानंतर एक्शन मोडमध्ये दिसणार आहे. हार्दिकला अस्वस्थ वाटत असल्याने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध शनिवारी 4 एप्रिलला झालेल्या सामन्याला मुकावं लागलेलं. त्यामुळे सूर्यकुमार यादव याने पलटणचं नेतृत्व केलं होतं. मात्र आता हार्दिक सज्ज आहे. मुंबईसमोर राजस्थान विरूद्ध गुवाहाटीतील होणाऱ्या सामन्यात दुहेरी आव्हान असणार आहे. हे आव्हान नक्की काय आहे? हे सविस्तर जाणून घेऊयात.

मुंबई इंडियन्ससमोर राजस्थान विरुद्ध आव्हान काय? जाणून घ्या

राजस्थान या मोसमात आतापर्यंत अजिंक्य आहे. राजस्थानने पहिल्या 2 सामन्यांत चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्सवर मात केली आहे. सलग 2 विजयांमुळे राजस्थानचा विश्वास वाढला आहे. त्यात राजस्थान तिसरा सामना घरच्या मैदानात खेळणार आहे. त्यामुळे राजस्थानला घरच्या चाहत्यांचा पाठिंबा असणार आहे. राजस्थानकडे मुंबईला पराभूत करुन सलग आणि एकूण तिसरा सामना जिंकण्याची संधी आहे. तर मुंबईसमोर पराभवानंतर विजयी ट्रॅकवर परतण्यासह राजस्थानला विजयी हॅट्रिकपासून रोखण्याचं दुहेरी आव्हान असणार आहे.

मुंबई आणि राजस्थान दोन्ही संघ 2022 पासून तुल्यबल

राजस्थान विरुद्ध मुंबईत 2022 पासून एकूण 6 सामने खेळवण्यात आले आहेत. या 6 पैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी 3-3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे चाहत्यांना आकडे पाहता मंगळवारीही चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

जसप्रीत बुमराह-वैभव सूर्यवंशी आमनेसामने

क्रिकेट चाहत्यांना मंगळवारी राजस्थान-मुंबई सामन्यानिमित्ताने वैभव सूर्यवंशी विरुद्ध जसप्रीत बुमराह अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नंबर 1 गोलंदाज आहे. तर वैभव सूर्यवंशी यानेही गेल्या वर्षभरात चमकदार कामगिरी केलीय. मात्र मंगळवारी वैभवसमोर बुमराहचं आव्हान असणार आहे. दोघेही पहिल्यांदाच आमनेसामने असणार आहेत. त्यामुळे वैभव बुमराहचा कसा सामना करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हार्दिकच्या कमबॅकने पलटणची ताकद वाढणार!

दरम्यान हार्दिक पंड्या याच्या कमबॅकमुळे मुंबईची ताकद वाढेल, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. हार्दिक बॅटिंग, बॉलिंगसह फील्डिंगही लाजबाव करतो. त्यामुळे मुंबईची या तिन्ही आघाड्यांवर ताकद वाढेल, अशी आशा चाहत्यांना आहे. अशात हार्दिक किती यशस्वी ठरतो हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला