AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुजरात ते मुंबई ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश, 30 लाखांच्या ड्रग्जसह माजी कॅबिन क्रू मेंबर अटकेत

गुजरातहून मुंबईत होणारी आंतरराज्य ड्रग्ज तस्करी रोखण्यात सूरत क्राईम ब्रँचला मोठे यश आले आहे. बडोद्याहून एका कारमधून मोठ्या प्रमाणावर 'एमडी' ड्रग्ज मुंबईला नेले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून कारवाई करत एका विमानातील माजी कॅबिन क्रू मेंबरला अटक केली आहे.

गुजरात ते मुंबई ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश, 30 लाखांच्या ड्रग्जसह माजी कॅबिन क्रू मेंबर अटकेत
गुजरात ते मुंबई ड्रग्स तस्करीचा पर्दाफाशImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 25, 2026 | 1:39 PM
Share

सूरत पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी एका कारचा पाठलाग करून 30 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले. या हायप्रोफाईल ड्रग्ज रॅकेटमध्ये विमानातील एका माजी कॅबिन क्रू सदस्याचा सहभाग समोर आला असून, तो बडोद्याहून मुंबईच्या दिशेने माल घेऊन चालला होता. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून या आंतरराज्य तस्करीचे धागेदोरे शोधले जात आहेत. गुजरातहून मुंबईत होणाऱ्या हायप्रोफाइल आंतरराज्य ड्रग्ज तस्करी प्रकरणाच्या तपासात आता एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूरत गुन्हे शाखेने दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर 30 लाख रुपयांच्या मेफेड्रोन (MD) ड्रग्जसह अटक केलेल्या मलेशियन एअरलाईन्सच्या माजी एअर होस्टेस आणि तिच्या साथीदाराचा मुंबईत अंमली पदार्थ विकण्याचा संपूर्ण मास्टरप्लॅन उघड झाला आहे.

पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे की, जप्त केलेले ड्रग्ज मुंबईत पोहोचवल्यानंतर त्याचे 5 ते 10 ग्रॅमचे लहान पॅकेट्स (प्लास्टिक बॅग्स आणि कंटेनर्स) तयार केले जाणार होते आणि मुंबईतील वेगवेगळ्या भागात ग्राहकांच्या मागणीनुसार (Based on Demand) त्यांची किरकोळ विक्री केली जाणार होती.

याप्रकरणी पोलिसांनी मलेशियन एअरलाईन्सची माजी कॅबिन क्रू मेंबर मानसी सईद (वय 41) आणि तिचा जुना साथीदार सोहेल सुलेमान शेख (वय 20) या दोघांना अटक केली असून, ते दोघेही मुंबईच्या सांताक्रूझ परिसरातील रहिवासी आहेत.

टोल नाक्यावर फिल्मी स्टाईलने पकडले ड्रग्ज

सूरत पोलिसांच्या गुन्हे शाखेला सोमवारी एक खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली होती की, बडोद्याहून एका भाड्याच्या कारमधून (Rented Car) मोठ्या प्रमाणावर मेफेड्रोन ड्रग्ज मुंबईच्या दिशेने नेले जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवरील कामरेज टोल पोस्टजवळ सापळा रचला.

एक संशयास्पद पांढऱ्या रंगाची कार टोल नाक्यावर येताच पोलिसांनी ती थांबवली. कारची झडती घेतली असता, पोलिसांना कारमध्ये मानसी सईद आणि सोहेल शेख बसलेले आढळले. पोलिसांनी कसून तपासणी केली असता, कारमधून तब्बल 977 ग्रॅम (अंदाजे 1 किलो) उच्च दर्जाचे मेफेड्रोन (MD) ड्रग्ज जप्त करण्यात आले, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सुमारे 30 लाख रुपये आहे. याशिवाय कारमधून ड्रग्ज पॅक करण्यासाठी आणलेल्या छोट्या प्लास्टिक पिशव्या, कंटेनर्स आणि अनेक मोबाईल फोन्स जप्त करण्यात आले आहेत.

रेल्वे स्टेशनजवळ अनोळखी महिलेकडून घेतली होती डिलिव्हरी

पोलिसांच्या कडक चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी कबूल केले की, त्यांनी ही कार मुंबईतून भाड्याने घेतली होती आणि ते ड्रग्ज घेण्यासाठी बडोद्याला गेले होते. बडोदा रेल्वे स्टेशनजवळ एका अनोळखी महिलेने त्यांच्याकडे हा ड्रग्जचा साठा सुपूर्द केला होता. तिथून ते थेट एक्सप्रेसवेने मुंबईला परतत असताना सूरत पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी ड्रग्ज लपवण्यासाठी आणि पोलिसांच्या अंमली पदार्थ शोधणाऱ्या श्वानांपासून वाचण्यासाठी लहान मुलांच्या डायपरचा वापर केला होता, जेणेकरून हायवेवर कौटुंबिक प्रवास सुरू असल्याचा बनाव करता येईल.

2015 पासून ड्रग्ज नेटवर्कमध्ये सक्रिय

तपासात असेही समोर आले आहे की, मुख्य आरोपी मानसी सईद ही 2015 पासूनच ड्रग्ज नेटवर्कच्या संपर्कात होती. सुरुवातीला ती स्वतः ‘एमडी’चे सेवन करायची, मात्र नंतर ती थेट तस्करीत सामील झाली. तिच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असून, 2021 मध्ये इंदूर गुन्हे शाखेने तिला 100 ग्रॅम मेफेड्रोनसह अटक केली होती, ज्यासाठी तिने तब्बल 4 वर्ष तुरुंगात काढली होती. तुरुंगातून बाहेर येताच तिने पुन्हा सोहेलच्या मदतीने मुंबईत 5 ते 10 ग्रॅमचे पॅकेट्स करून विकण्याचे हे नवे रॅकेट सुरू केले होते.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला