IPL 2026: पंजाबविरुद्धच्या सामन्यात आरसीबीने रजत पाटीदारला बसवलं, आयसीसी नियमामुळे घडलं असं

आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब किंग्सला पराभूत करून आरसीबीने प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. पण या सामन्यात आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार उतरला नाही. त्याच्या ऐवजी जितेश शर्माने कर्णधारपद भूषवलं. पण आता त्यामागचं खरं कारण समोर आलं आहे.

IPL 2026: पंजाबविरुद्धच्या सामन्यात आरसीबीने रजत पाटीदारला बसवलं, आयसीसी नियमामुळे घडलं असं
IPL 2026: पंजाबविरुद्धच्या सामन्यात आरसीबीने रजत पाटीदारला बसवलं, आयसीसी नियमामुळे घडलं असं
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 18, 2026 | 4:46 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील 61वा सामना पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्याने आरसीबीच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. पण नाणेफेकीवेळी जितेश शर्मा आल्याने सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी जितेश शर्माला कारण विचारलं गेलं मात्र त्याने ठोसं असं काही सांगितलं नाही. पण आता त्या मागचं खरं कारण पुढे आलं आहे. आयसीसीच्या एका नियमामुळे त्याला या सामन्यात उतरता आलं नाही. त्याला पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात सामन्यात आराम दिला गेला. खरं तर हा सामना प्लेऑपच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. या महत्त्वाच्या सामन्यात त्याला बेंचवर बसलेलं पाहून आश्चर्य वाटलं. जितेश शर्माने पुढे सांगितलं की, पाटीदार सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात खेळणार आहे.

आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी 13 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि आरसीबी यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात केकेआरचा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीने टाकलेला एक भेदक बाउन्सर थेट रजत पाटीदारच्या हेल्मेटला लागला होता.सामन्यादरम्यान त्याची प्राथमिक वैद्यकीय तपासणी यशस्वी झाली आणि त्याने फलंदाजी सुरू ठेवली. मात्र, सामन्यानंतर त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याची लक्षणे दिसू लागली. परिणामी आरसीबी संघ व्यवस्थापनाने पाटीदारला पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यातून वगळले.

आयसीसीच्या वैद्यकीय नियमांनुसार, जर कोणत्याही खेळाडूला डोक्याला दुखापत झाल्याचे निश्चित झाले किंवा त्याची लक्षणे दिसू लागली, तर त्याला पुढील सामन्यात खेळवता येत नाही. त्याऐवजी, त्याला विश्रांती घेणे आवश्यक असते. गंभीर लक्षणे आढळल्यास, त्याला किमान 7 दिवस स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर राहावे लागते. रजत पाटीदारची दुखापत गंभीर नाही. पण, आयसीसीच्या नियमांनुसार रजत पाटीदारला विश्रांती देण्यात आली. रजत पाटीदार 15 मे रोजी हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणाऱ्या सामन्यात पुनरागमन करेल.

आरसीबीने आयपीएल स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केलं आहे. टॉप 2 मधील स्थान कायम ठेवण्यासाठी शेवटचा सामना जिंकणं भाग आहे. नाही तर क्वॉलिफायर 1 ऐवजी एलिमिनेटर सामना खेळावा लागेल. त्यामुळे हा विजय तितकाच महत्त्वाचा आहे.

Follow Us