RR vs LSG : मार्श-इंग्लिसचा तडाखा, लखनौच्या 220 धावा, राजस्थान आरपारच्या लढाईत जिंकणार?
Rajasthan Royals vs Lucknow Super Giants, 1st Inning : या हंगामात 8 वेळा 220 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्यात आला आहे. त्यामुळे राजस्थान या हंगामात नवव्यांदा अशी कामगिरी करुन दाखवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 64 व्या सामन्यात 220 धावा करुन प्लेऑफच्या चौथ्या आणि शेवटच्या स्थानासाठी शर्यतीत असलेल्या राजस्थान रॉयल्सच्या अडचणीत वाढ केली आहे. प्लेऑफसाठी गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स या 3 संघांनी प्लेऑफचं तिकीट मिळवलं. त्यामुळे उर्वरित 1 जागेसाठी 5 संघांत चुरस आहे. मात्र राजस्थान एका जागेसाठी प्रबळ दावेदार आहे. अशात लखनौ सुपर जायंट्सच्या सलामी जोडीने राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात तोडफोड बॅटिंग केलीय. जोश इंग्लिस आणि मिचेल मार्श या सलामी जोडीने केलेल्या स्फोटक बॅटिंगच्या जोरावर लखनौने राजस्थानसमोर 221 धावांचं आव्हान ठेवलं आहे. लखनौने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 220 धावा केल्या. त्यामुळे आता राजस्थान विजयी धावा करुन प्लेऑफमधील आपलं आव्हान कायम राखण्यात यशस्वी ठरणार का? याचं उत्तर थोड्याच वेळात मिळेल.
मिचेल मार्श-जोश इंग्लिसचा धमाका
राजस्थान रॉयल्स टीमने टॉस जिंकला. रियान पराग याच्या अनुपस्थितीत हंगामी कर्णधार यशस्वी जैस्वाल याने टॉस जिंकला. राजस्थानने लखनौला बॅटिंगसाठी भाग पाडलं. जोश आणि मिचेल मार्श या दोघांनी लखनौला चाबूक सुरुवात करुन दिली. इंग्लिस आणि मार्शने सलामी शतकी भागीदारी करुन लखनौच्या द्विशतकाचा पाया रचला. दोघांनी 50 बॉलमध्ये 109 रन्सची पार्टनरशीप केली. या दरम्यान दोघांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावलं.
लखनौने जोश इंग्लिस याच्या रुपात पहिली विकेट गमावली. जोशने 29 बॉलमध्ये 60 रन्स केल्या. जोशने या खेळीत 3 सिक्स आणि 7 फोर लगावले. लखनौने निकोलस पूरन याच्या रुपात दुसरी विकेट गमावली. निकोलसला या चांगल्या सुरुवातीचा फायदा घेऊन फटकेबाजी करण्याची संधी होती. मात्र निकोलस अपयशी ठरला. निकोलस 11 बॉलमध्ये 16 रन्स केल्या.
त्यानंतर कॅप्टन ऋषभ पंत याने मार्शला चांगली साथ दिली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 41 बॉलमध्ये 64 रन्स जोडल्या. त्यानंतर राजस्थानने लखनौला 6 धावांच्या मोबदल्यात 3 झटके दिले. ऋषभ पंत 35 धावांवर रन आऊट झाला. तर मिचेल मार्श याचं शतक अवघ्या 4 धावांनी हुकलं. मार्शने लखनौसाठी सर्वाधिक धावा केल्या. मार्शने 57 बॉलमध्ये 96 रन्स केल्या. मार्शने या दरम्यान 5 सिक्स आणि 11 फोर ठोकले. तर राजस्थानसाठी यश राज पुंजा याने 2 विकेट्स मिळवल्या. तर जोफ्रा आर्चर याने 1 विकेट मिळवली.
लाईव्ह स्कोअरकार्ड
राजस्थानसाठी निर्णायक सामना
प्लेऑफच्या एका जागेसाठी जोरदार चुरस आहे. राजस्थानला इतर संघांच्या तुलनेत प्लेऑफची सर्वाधिक संधी आहे. मात्र त्यासाठी राजस्थानला दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे राजस्थान हा सामना जिंकून आव्हान कायम राखणार की लखनौ गेम बिघडवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.