AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs LSG : राजस्थानची अटीतटीच्या सामन्यात टॉस जिंकून फिल्डिंग, वैभव सूर्यवंशी आऊट

Rajasthan Royals vs Lucknow Super Giants Toss and Playing 11, IPL 2026 : राजस्थान रॉयल्ससाठी प्लेऑफच्या हिशोबाने हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे राजस्थान लखनौ विरुद्ध जिंकणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

RR vs LSG : राजस्थानची अटीतटीच्या सामन्यात टॉस जिंकून फिल्डिंग, वैभव सूर्यवंशी आऊट
Rishabh Pant and Yashasvi Jaiswal RR vs LSG IPL 2026Image Credit source: IPL X Account
| Updated on: May 19, 2026 | 8:10 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 64 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या हंगामातील 13 वा सामना आहे. सामन्यांचा आयोजन हे राजस्थानचं होम ग्राउंड असलेल्या जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. ऋषभ पंत लखनौचं नेतृत्व करत आहे. तर राजस्थानने कॅप्टन बदलला आहे. रियान पराग याच्या अनुपस्थितीत यशस्वी जैस्वाल नेतृत्वाची धुरा सांभाळत आहे. उभयसंघातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. राजस्थानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन यशस्वीने फिल्डिंगचा निर्णय घेत लखनौला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

राजस्थान जयपूरमध्ये खातं उघडणार?

राजस्थानचं गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियम हे दुसरं होम ग्राउंड आहे. राजस्थानने या मैदानात 19 व्या मोसमात खेळलेले तिन्ही सामने जिंकले आहेत. तर राजस्थानचं जयपूर हे पहिलं होम ग्राउंड आहे. मात्र राजस्थानला 19 व्या मोसमात या मैदानात खेळलेल्या 3 पैकी एकाही सामन्यात जिंकता आलेला नाही. त्यामुळे राजस्थान चौथ्या सामन्यात विजयाची प्रतिक्षा संपवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जयपूरमधील आकडेवारी

आयपीएल 2026 स्पर्धेतील हा एकूण 11 वा सामना आहे. याआधी या मैदानात एकूण 10 पैकी 4 सामन्यांत पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय झाला आहे. तर 6 वेळा धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने मैदान मारलं आहे.

प्लेइंग ईलेव्हन अपडेट

राजस्थानने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 3 बदल केले आहेत. संदीप शर्मा, सुशांत मिश्रा आणि लुहान ड्री प्रिटोरियस या तिघांना संधी देण्यात आली आहे. तर वैभव सूर्यवंशी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार आहे. तर लखनौ सुपर जायंट्स टीमच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये मोहसिन खान आणि आयुष बडोनी या दोघांचं कमबॅक झालं आहे.

लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन: मिचेल मार्श, जोश इंग्लिस, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), आयुष बडोनी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, मोहसीन खान, मयंक यादव, आकाश महाराज सिंग आणि प्रिन्स यादव.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन: यशस्वी जैस्वाल (कर्णधार), लुआन-द्रे प्रिटोरियस, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), डोनोवन फरेरा, शुभम दुबे, दासुन शनाका, जोफ्रा आर्चर, सुशांत मिश्रा, संदीप शर्मा, ब्रिजेश शर्मा आणि यश राज पुंजा.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...