IPL 2026 : कोलकाता नाईट रायडर्सचा मोठा निर्णय, जर्सी नंबर 12 बाबत अशी घोषणा

Andre Russell jersey : आंद्रे रसेल याने केकेआर टीमला अनेक सामन्यांमध्ये बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावर एकहाती विजय मिळवून दिला आहे. रसेच्या या योगदानसाठी केकेआर टीमने त्याचा मोठा सन्मान केला आहे.

IPL 2026 : कोलकाता नाईट रायडर्सचा मोठा निर्णय, जर्सी नंबर 12 बाबत अशी घोषणा
Andre Russell KKR IPL
Image Credit source: AFP
| Updated on: Mar 24, 2026 | 11:45 PM

ऑलराउंडर आंद्रे रसेल याने आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावर जगातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत लीग असलेल्या आयपीएल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलीय. रसेलने केकेआर अर्थात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना गेल्या काही मोसमात धमाका केला. या अशा अप्रतिम कामगिरीनंतर आंद्रेने आयपीएलमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. टीमसाठी बहुमूल्य योगदान देणाऱ्या आंद्रेसाठी केकेआरने 19 व्या मोसमासाआधी मोठा निर्णय घेतला आहे. केकेआरने जर्सी नंबर 12 कायम रिटायर केली आहे. अर्थात यापुढे कोणत्याही केकेआरच्या खेळाडूला जर्सी नंबर 12 वापरता येणार नाही. रसेलच्या सन्मानासाठी केकेआरने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

Follow Us