AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : रिंकु सिंह याला लॉटरी, थेट केकेआरच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी

Kolkata Knight Riders Ipl 2026 : कोलकाता नाईट रायडर्सने 19 व्या मोसमाआधी मोठी घोषणा केली आहे. केकेआरने उपकर्णधारपदी रिंकु सिंह याची नियुक्ती केली आहे.

IPL 2026 : रिंकु सिंह याला लॉटरी, थेट केकेआरच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी
KKR Vice Captain Rinku SinghImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 25, 2026 | 3:13 AM
Share

आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमाची लगबग जोरात सुरु आहे. स्पर्धेला आता अवघे काही दिवस बाकी आहेत. आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या पर्वाचा थरार हा 28 मार्चपासून रंगणार आहे. सर्व 10 संघांनी या स्पर्धेसाठी कंबर कसली आहे. त्याआधी कोलकाता नाईट रायडर्स टीमच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. विस्फोटक फलंदाज रिंकु सिंह याचं प्रमोशन झालं आहे. रिंकु सिंह याची कोलकाता नाईट रायडर्सच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केकेआर टीम मॅनेजमेंटकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

रिंकूचं आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळण्याचं हे आठवं वर्ष असणार आहे. रिंकूने केकेआरसाठी 2018 साली पदार्पण केलं होतं. रिंकूला 2018 मध्ये केकेआरसाठी फक्त 29 धावाच करता आल्या. रिंकूने त्यानंतर दुसऱ्या हंगामात 37 धावा जोडल्या. त्यानंतर रिंकूला फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. रिंकूने 11 धावा केल्या. मात्र रिंकूने संधी कमी मिळाल्याची तक्रार केली नाही. रिंकूने संधीची वाट पाहिली आणि तोवर कठोर मेहनत घेतली. रिंकु केकेआरचा प्रमुख फलंदाजांपैकी एक आहे. तसेच विश्वासू फिनिशिरही आहे. आता रिंकु 19 व्या मोसमात उपकर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे. तर अजिंक्य रहाणे याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी आहे.

रिंकूची आयपीएल कारकीर्द

रिंकूने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील एकूण 51 डावांत बॅटिंग केली आहे. रिंकूने या 51 डावांत 30.52 च्या सरासरीने आणि 145 च्या स्ट्राईक रेटने 1 हजार धावा केल्या आहेत. रिंकूने आयपीएल कारकीर्दीत एकूण 4 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच रिंकूच्या नावावर आयपीएलमध्ये 56 षटकारांची नोंद आहे. तसेच रिंकूने 87 चौकारही लगावले आहेत.

रिंकुंसमोर आव्हान काय?

रिंकूसाठी गेली काही आठवडे काही खास राहिले नाहीत. रिंकूने त्याच्या वडिलांना गमावलं. तसेच रिंकूला बॅटिंगने काही खास करता आलं नाहीय. रिंकूने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील 5 सामन्यात फक्त 23 धावा केल्या. मात्र त्यानंतरही रिंकूवर केकेआर मॅनेजमेंटने विश्वास दाखवला आहे. त्यामुळे रिंकूसमोर केकेआरने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचं आव्हान आहे.

आयपीएलच्या 19 व्या मोसमासाठी केकेआर टीम : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग (उपकर्णधार), मनीष पांडे, रोव्हमन पॉवेल, अंगकृष रघुवंशी, रमणदीप सिंग, सुनील नरेन, अनुकुल रॉय, वैभव अरोरा, हर्षित राणा, उमरान मलिक, वरुण चक्रवर्ती, कॅमेरून ग्रीन, फिन ऍलन, मथीशा पाथीराना, कार्तिक त्यागी, राहुल त्रिपाठी, टीम सायफर्ट, तेजस्वी दहीया, सार्थक रंजन, रचीन रवींद्र, आकाश दीप, प्रशांत सोळंकी आणि दक्ष कामरा.

Follow Us
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला