AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : अजिंक्य रहाणेची 19 व्या मोसमाआधी चाबूक बॅटिंग, केकेआरच्या कॅप्टनचा धमाका

Ajinkya Rahane IPL 2026 KKR : अजिंक्य रहाणे अनुभवी फलंदाज आणि कर्णधार आहे. मात्र रहाणेच्या बॅटिंगबाबत कायम शंका घेतली जाते. रहाणेने चाबूक बँटिंग करुन त्याच्या टीकाकारांना उत्तर दिलंय. जाणून घ्या अजिंक्यने कोणत्या सामन्यात किती धावा केल्यात.

IPL 2026 : अजिंक्य रहाणेची 19 व्या मोसमाआधी चाबूक बॅटिंग, केकेआरच्या कॅप्टनचा धमाका
Ajinkya Rahane KKR IplImage Credit source: KKR
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 24, 2026 | 7:13 AM
Share

एकूण 3 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी 19 व्या मोसमात अजिंक्य रहाणे याच्याकडे आहे. कोलकाता नाईट रायडर्स टीम सध्या जोरदार सराव करत आहे. अजिंक्य रहाणे याला नेतृत्वाचा तगडा अनुभव आहे. मात्र अजिंक्यवर वेगवान बॅटिंगबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मात्र अजिंक्यने त्याच्या या क्षमतेवर शंका घेणाऱ्यांना बॅटिंगनेच उत्तर दिलं आहे. अजिंक्यने सराव सामन्यादरम्यान चौकार षटकार ठोकून आपण मुख्य स्पर्धेसाठी सज्ज असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच अजिंक्यने टीकाकारांनाही चोख उत्तर दिलंय.

खेळाडूंचा जास्तीत जास्त सराव व्हावा या हेतूने टीममधील खेळाडूंना 2 संघात विभागून इन्ट्रा स्क्वाड सामने खेळवण्यात येतात. त्यानुसार कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात इंट्रा स्क्वाड सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पर्पल नाईट्सने थोडेथोडके नव्हे तर 249 धावा केल्या. पर्पल नाईट्सला इथवर पोहचवण्यात रहाणेने प्रमुख भूमिका बजावली. रहाणेने फक्त 25 बॉलमध्ये 58 धावांची खेळी केली. रहाणेने या दरम्यान न्यूझीलंडच्या फिन एलन याच्यासह ओपनिंग करत आक्रमक सुरुवात मिळवून दिली.

दे दणादण ‘ओपनिंग’

रहाणे आणि एलन या दोघांनी पहिल्याच बॉलपासून फटकेबाजीला सुरुवात केली. फिन एलन याने 16 बॉलमध्ये 31 धावा केल्या. तसेच कॅमरुन ग्रीन याने 52 धावांची खेळी केली. तर रमनदीप सिंग याने 16 चेंडूत 42 धावांचं योगदान दिलं.

ओपनिंग आणि अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणे याने टी 20 क्रिकेटमध्ये ओपनिंगला आल्यानंतर चांगली कामगिरी केल्याचं आकड्यातून स्पष्ट होतं. अजिंक्यने टी 20 कारकीर्दीतील बुहतांश धावा या ओपनर म्हणूनच केल्या आहे. तसेच रहाणे पावरप्लेमध्ये बॅटिंग करण्यात माहिर आहे. अजिंक्यने आतापर्यंत पावर प्लेमध्ये वेगाने धावा केल्या आहेत.

गोल्डन नाईटचा विजय

केकेआरचा पहिला सामना कधी?

केकेआर 19 व्या मोसमातील आपला पहिला सामना हा 29 मार्च रोजी खेळणार आहे. केकेआरसमोर या सामन्यात मुंबई इंडियन्सचं आव्हान असणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. वानखेडे स्टेडियम अजिंक्यचं होम ग्राउंड आहे. अजिंक्यला या मैदानातील प्रत्येक कोपरा माहितीय. त्यामुळे रहाणे या मोसमाची सुरुवात कशी करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?