AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्जुनचं काय होणार? 20 लाख बेस प्राईज! मुंबई इंडियन्स त्याला विकत घेणार की नाही?

IPL Auction 2022 on Ajun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरवर 20 लाख बेस प्राईज ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे तो सोल्ड होतो की अनसोल्ड राहतो, याकडे अनेक जाणकारांची बारीक नजर असणार हे नक्की!

अर्जुनचं काय होणार? 20 लाख बेस प्राईज! मुंबई इंडियन्स त्याला विकत घेणार की नाही?
अर्जुन तेंडुलकरचं काय होणार? (Photo - Instagram/arjuntendulkar)
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Feb 13, 2022 | 8:19 PM
Share

मुंबई : दिग्गज खेळाडूंवर कितीची बोली लागते, याकडे जशी नजर सगळ्यांची असते, तशीच नजर ही छोट्या खेळाडूंवरही असते. अशातच आता जर का अर्जुन तेंडुलकरवर (Arjun Tendulkar) नजर नाही राहिली, तरच आश्चर्य! पण आतापर्यंतच्या बोलीत तरी अर्जुन तेंडुलकरचं नाव समोर आलेलं नाही. अशातच ट्वीटरवर आणि इतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) अर्जुन तेंडुलकरला आपल्यासोबत ठेवणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. गेल्याच वर्षी मुंबई इंडियन्सनं अर्जुन तेंडुलकरला आपल्या चमूत सामील करुन घेतलं होतं. त्यानंतर यंदा अर्जुन तेंडुलकरवर 20 लाखाची बेस प्राईज ठेवत त्याचा लिलाव केला जाण्याची दाट शक्यता आहे. अशात अर्जुन तेंडुलवरवर कितीची बोली (Biding on Arjun Tendulkar) लागते, हे पाहणं महत्त्वाचंय. मात्र सचिन तेंडुलकरचा मुलगा असलेल्या अर्जुनला मुंबई आपल्यासोबत ठेवणार काही नाही, याचीच जास्त चर्चा रंगली आहे.

अर्जुनचं नाव अजून का आलं नाही?

आयपीएल ऑक्शनचा रविवार हा दुसरा दिवस आहे. रविवारी दिवसभरात वेगवेगळ्या छोट्या मोठ्या खेळाडूंवर बोली लावण्यात आल्या. यावेळी अनेकांची नजर ही अर्जुन तेंडुलकरच्या बोलीकडे लागलेली आहे. अर्जुन तेंडुलकरचं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचंय. कारण गेल्या वर्षी तो मुंबई इंडियन्सच्या सोबत होता. सचिन तेंडुलकर हा देखील आयपीएल सुरु झाल्यापासूनच मुंबई इंडियन्स संघासोबत जोडला गेलेला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघासोबत सचिनचे आणि संघ व्यवस्थापनाचेही जवळचे संबंध आहेत. अशातच अर्जुनला मुंबई इंडियन्स रिलीज करण्याची शक्यताही कमी असल्याचंच बोललं जातंय.

20 लाख बेस प्राईज..!

अर्जुन तेंडुलकरवर 20 लाख बेस प्राईज ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे तो सोल्ड होतो की अनसोल्ड राहतो, याकडे अनेक जाणकारांची बारीक नजर असणार हे नक्की! गेल्या वर्षी आपल्या जखमेमुळे अर्जुनला मुंबई इंडियन्सकडून एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. दरम्यान, यावेळी अर्जुन कोणत्या संघातून आयपीएलच्या मैदानात उतरतो आणि कशी कामगिरी करतो, यावर मात्र सगळ्यांचच लक्ष लागलेलंय. अर्जुन तेंडुलकर हा डावखुरा फलंदाज आणि गोलंदाज असून तो सध्या 22 वर्षांचा आहे. भारताच्या अंडर-19 संघातही अर्जुनचा समावेश झाला होता.

ट्वीटरवर ट्रेन्ड!

सध्या ट्वीटरवर अर्जुन तेंडुलकर ट्रेन्ड होत असून अनेकांनी तो कुठं आहे? त्याची बोली कधी लागणार असा सवाल उपस्थित केला आहे. तर काहींनी त्याची खिल्लीदेखील उडवली आहे.

कुठंय अर्जुन? ट्वीटरवर चर्चा!

कोण खरेदी करणार अर्जुनला?

गुजरातच्या संघानं अर्जुनला खरेदी केलं तर शुभमन गिलची रिएक्शन काय असेल?

संबंधित बातम्या :

Tushar Deshpande IPL 2022 Auction: धोनीच्या टीममधून खेळणारा मराठी मुलगा तुषार देशपांडे कोण आहे?

CSK IPL Auction 2022: चेन्नईची टीम तयार! धोनीच्या संघात कुणाला घेतलं? कुणाला नाही? जाणून घ्या

RCB IPL Auction 2022: विराटच्या RCB ने आतापर्यंत विकत घेतलेल्या खेळाडूंच्या यादीवर एक नजर मारा

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या