IPL 2024 Purple Cap: जसप्रीत बुमराह पुन्हा झाला सरस, हैदराबादविरुद्ध केली अशी कामगिरी

IPL 2024 Purple Cap, Most wicket taker : पर्पल कॅपच्या शर्यतीत मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणखी एक पाऊल पुढे गेला आहे. त्यामुळे त्याला आता पुन्हा गाठण्यासाठी टॉप पाच मधील एखाद्या गोलंदाजाला तीन ते चार विकेट्स घ्यावे लागतील.

IPL 2024 Purple Cap: जसप्रीत बुमराह पुन्हा झाला सरस, हैदराबादविरुद्ध केली अशी कामगिरी
Follow us
| Updated on: May 06, 2024 | 11:17 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात पर्पल कॅपची चुरस पाहायला मिळाली असती. पण सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजन काही खास करू शकला नाही. त्यामुळे पर्पल कॅपचा मान मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे राहिला. मुंबई इंडियन्सने प्रथम गोलंदाजी करत सनरायझर्स हैदराबादला 173 धावांवर रोखलं. या डावात जसप्रीत बुमराहाने चांगला स्पेल टाकला. जसप्रीत बुमराहने 4 षटकात 23 धावा देत एक गडी बाद केला. यासह पर्पल कॅप डोक्यावर कायम ठेवली. तसेच 4 षटकात फक्त 23 धावा दिल्याने इकोनॉमी रेटही संतुलित ठेवला आहे. त्याामुळे इकोनॉमी रेटच्या बाबतीत जसप्रीत बुमराहचा हात पकडणं काही सोपं नाही. कारण टी20 मध्ये बॉल रडारमध्ये आला की थेट सीमेपारच पोहोचवला जातो.

जसप्रीत बुमराहने 12 सामन्यात 47.5 षटकं टाकत 297 धावा दिल्या आणि 18 गडी बाद केले. त्याचा इकोनॉमी रेट हा 6.20 इतका आहे. दुसऱ्या क्रमांकावर पंजाब किंग्सचा हर्षल पटेल आहे. त्याने 11 सामन्यात 37 षटकं टाकत 362 धावा दिल्या आणि 17 गडी बाद केले. त्याचा इकोनॉमी रेट हा 9.78 इतका आहे. तिसऱ्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्सचा वरुण चक्रवर्ती आहे. त्याने 11 सामन्यात 40 षटकं टाकतं 350 धावा देत 16 गडी बाद केले आहेत. त्याचा इकोनॉमी रेट हा 8.75 आहे. चौथ्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबादचा टी नटराजन आहे. त्ायने 9 सामन्यात 35.2 षटकं टाकत 318 धावा देत 15 गडी बाद केले. त्याचा इकोनॉमी रेट 9 आहे. पाचव्या क्रमांकावर पंजाब किंग्सचा अर्शदीप सिंग आहे. त्याने 11 सामन्यात 39.2 षटकं टाकत 15 गडी बाद केले आहेत. त्याचा इकोनॉमी रेट 10.06 आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॅनसेन, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.

Non Stop LIVE Update
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?.
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना.
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.