IPL 2024 Purple Cap: सनरायझर्स हैदराबाद राजस्थान रॉयल्स सामन्यानंतर पर्पल कॅपचा मान कोणाला?

IPL 2024 Purple Cap, Most wicket taker : सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स सामन्यानंतर पर्पल कॅपच्या शर्यत आणखी रंगतदार झाली आहे. युझवेंद्र चहलला पर्पल कॅपची संधी होती. मात्र चार षटकात त्याला एकही विकेट घेता आली नाही. पण टी नटराजने जसप्रीत बुमराहला मागे टाकलं आहे.

IPL 2024 Purple Cap: सनरायझर्स हैदराबाद राजस्थान रॉयल्स सामन्यानंतर पर्पल कॅपचा मान कोणाला?
Follow us
| Updated on: May 02, 2024 | 11:47 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून टी नटराजन याने चांगली गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 35 धावा देत 2 गडी बाद केले. यासह टी नटराजन याच्या नावावर एकूण 15 गडी झाले आहेत. यासह टी नटराजनने पर्पल कॅपचा मान मिळवला आहे. टी नटराजन याने 8 सामन्यात 32 षटकात 287 धावा देत 15 गडी बाद केले. टी नटराजनचा इकोनॉमी रेट हा 8.96 इतका होता. जसप्रीत बुमराह 10 सामन्यात 40 षटकं टाकत 256 धावा दिल्या आणि 14 गडी बाद केले. त्याचा इकोनॉमी रेट हा 6.40 इतका आहे. तिसऱ्या स्थानावर चेन्नई सुपर किंग्सचा मुस्तफिझुर रहमान आहे. त्याने 9 सामन्यात 34.2 षटकात 318 धावा केल्या आणि 14 गडी बाद केले. मुस्तफिझुर रहमानचा इकोनॉमी रेट हा 9.26 आहे.

चौथ्या स्थानावर पंजाब किंग्सचा हर्षल पटेल आहे. त्याने 10 सामन्यात 33 षटकं टाकत 338 धावा देत 14 गडी बाद केले. त्याच्या गोलंदाजीचा इकोनॉमी रेट हा 10.24 इतका आहे. पाचव्या स्थानावर चेन्नई सुपर किंग्सचा मथीशा मथिराना आहे. त्याने 6 साम्यात 22 षटकं टाकत 13 गडी बाद केले. त्याचा इकोनॉमी रेट हा 7.68 इतका आहे.

सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला अवघ्या एका धावेने पराभूत केलं आहे. या विजयासह हैदराबादने टॉप 4 मध्ये पुन्हा एकदा स्थान मिळवलं आहे. त्यामुळे आता उर्वरित 4 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला की प्लेऑफमधील स्थान पक्कं होणार आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने 16 गुणांसह प्लेऑफमधील स्थान पक्कं केलं आहे. या सामन्यातील पराभवानंतर संजू सॅमनस म्हणाला की, “आम्ही या पर्वीत काही अगदी जवळचे सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन जिंकले आहेत आणि एक गमावला आहे. हैदराबादच्या गोलंदाजांनी ज्या प्रकारे झुंज दिली. हे त्यांचं श्रेय आहे. नवीन चेंडूवर फलंदाजी करणे कठीण होते आणि जुने झाल्यावर ते सोपे झाले. विजयाच्या जवळ आणण्याचं श्रेय जयस्वाल आणि परागला.. मी आणि जोस पॉवरप्लेमध्ये आऊट झालो, त्यांनी चांगला खेळ केला आणि आम्हाला विजयाच्या उंबरठ्यावर आणलं.”

दोन्ही संघांची प्लेइंग 11

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॅनसेन, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन.

Non Stop LIVE Update
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?.
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?.
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर.
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल.
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.